निरोगी माणसाच्या शरीराचे सरासरी तापमान साधारणपणे 37° सेल्सिअस इतके असते. मात्र उष्ण गुणधर्म असणारे पदार्थ जास्त प्रमाणात आहारात असल्यास, जास्त वेळ उन्हात काम केल्याने, जड औषधे घेतल्याने, प्रमाणापेक्षा जास्त खाल्याने खाल्याने, रात्री पुरेशी झोप न घेतल्याने, प्रमाणापेक्षा जास्त चहा प्यायल्याने सुद्धा शरीरातील उष्णता वाढत असते.
तसेच आपले पोट गच्च झाल्यासारखे हि वाटते. लघवीचा रंग पिवळसर होतो, पित्त वाढते म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत शरीरातील उष्णता, पोट साफ न होणे, पित्त कमी करण्यासाठी घरगुती उपाय. कडुलिंबाच्या मदतीने आपल्या शरीरातील उष्णता कशी कमी करायची हे जाणून घेऊयात
कडुलिंबाच्या झाडाला आयुर्वेदामध्ये खूप महत्व आहे. कडूलिंबाची पान, फुल, मुळ, फळ, साल अश्या सर्व गोष्टी वेगवेगळ्या आजारावर ईलाज करण्यासाठी फार पूर्वी पासून वापरले जातात. सर्वप्रथम 50 ग्राम कडूलिंबाची हिरवी पाने स्वच्छ धुवून घ्या.
नंतर मिक्सर मध्ये बारीक करून घ्या. आता ह्या पानामध्ये एक छोटासा सेंद्रिय गुळाचा खडा बारीक करून त्यामध्ये मिसळा. अन मग हाताने लहान लहान गोळ्या तयार करा.
ह्या गोळ्या सकाळी रिकाम्या पोटी दोन गोळ्या कपभर गायीच्या दुधासोबत ह्या प्रमाणात घ्यायच्या साधारणपणे आठ ते दहा दिवस घ्या. ह्या उपायाने आपल्या शरीरातील उष्णता कमी होऊन आपल्याला होणारा पित्ताचा त्रास कमी होईल.
तसेच ह्या उपायाचा काहीही साईड इफेक्ट हि नाही. फक्त ज्याना डायबेटिसचा त्रास आहे त्यांनी गोळ्या बनवताना गुळ वापरू नका. शरीरामध्ये अतिरिक्त उष्णता वाढून द्यायची नसेल तर आपण पुढील प्रकारे काळजी घेऊ शकता.
अधिक तेलकट आणि मसालेदार अन्न पदार्थ खाणे टाळा. दिवसभरात पुरेसे म्हणजेच तीन ते चार लिटर पाणी प्या. रात्री पुरेशी झोप म्हणजेच सहा ते आठ तास झोप घ्या. रात्री हलका आहार घ्या. मिठाचा वापर आहारात कमी असू द्या. रोज रोज मांसाहार करणे टाळा. अति गोड असणारे पदार्थ (साखरेचे पदार्थ) खाणे टाळा.
पुदीन्याच्या पानाचा सरबत, ताक, लिंबू पाणी प्यायल्याने आपल्या शरीरातील उष्णता कमी व्हायला मदत मिळते. तसेच काकडी, कलिंगड, टरबूज, खरबूज,संत्री मोसंबी अशा पाणीदार फळांचा हि आपल्या आहारात समावेश असू द्या.
ज्यांना उष्णतेचा त्रास नेहमी होतो त्यांनी दिवसभरात एकदा तरी नारळ पाणी प्यायले पाहिजे. नारळ पाणी प्यायल्याने आपल्या शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी होईल. शरीराचे तापमान नियंत्रणात राहण्यासाठी डाळिंबाचा रस दिवसातून दोन वेळा प्या.
शरीराचे तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी आपण दोन चमचे धने एक ग्लास पाण्यात रात्री भिजायला घालून सकाळी मिक्सर मध्ये बारीक करून घ्या नंतर गाळून प्या. आठ दिवस हा उपाय केल्याने आपल्याला फरक जाणवेल.
पित्त कमी करण्यासाठी जेवणानंतर चिमुटभर बडीशेप चघळा. बडीशेप चघळल्याने पचनसंस्थेतील सूज कमी होते,आणि पित्ताचा त्रास कमी व्हायला मदत मिळते. पित्ताचा त्रास जाणवत असल्यावर 4 ते 5 तुळशीची पाने चावून खा. आपल्याला आराम मिळेल.
आपल्याला शरीरातील उष्णता, पोट साफ न होणे, पित्त कमी करण्यासाठी घरगुती उपाय ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.
जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा.
महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.