- आरोग्य

स्त्रियांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याआधी हि लक्षणे दिसून येतात

पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढताना आपल्याला दिसत आहे. आपल्या देशामध्ये कर्करोगापेक्षा हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण जास्त आहे. महिलांमध्ये हृदयविकाराची लक्षणे पुरुषांपेक्षा वेगळी असतात. हृदयविकाराचा झटका येण्याचे मुख्य कारण हे शरीरात वाढलेली कोलेस्टेरॉल पातळी हे आहे.

कोलेस्टेरॉल हा चरबीसारखा पदार्थ असतो. जो आपल्या शरीराच्या प्रत्येक पेशीमध्ये आढळतो. जेव्हा शरीरामध्ये कोलेस्ट्रोल जास्त प्रमाणात बनवले जाते तेव्हा ते रक्तामधून संपूर्ण शरीरभर पाठवले जाते. जास्तीचे कोलेस्ट्रोल रक्तवाहिन्यांमध्ये जमा होते. यामुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात आणि हृदयरोगाचा धोका वाढतो.

आपण जाणून घेणार आहोत हृदयविकाराचा झटका येण्याआधी स्त्रियांमध्ये कोणकोणती लक्षणे दिसून येतात. जेणेकरून वेळ राहताच आपण त्यानुसार इलाज करू शकाल. हृदयविकाराचा झटका येण्याआधी बऱ्याचदा अचानक छातीत दुखायला लागते. अस्वस्थ वाटायला लागत. धमनीमध्ये अडथळा आल्यामुळे छातीत दुखत असते.

अचानक पायांना आणि तळव्यांना सूज येणे हे सुद्धा हृदयरोगाशी संबंधित असू शकते. अनेक वेळा हृदयामध्ये योग्य रक्ताभिसरणा क्रिया योग्य प्रकारे होत नसल्यास त्यामुळे हि पाय, गुडघे आणि तळव्यांना सूज येऊ शकते.

थोडेसे काम केले तरी दम लागतो, थकवा येतो. बऱ्याचदा श्वास घ्यायला हि अडचण येते. उलट्या झाल्यावर मळमळ वाटणे हे देखील हृदयविकाराचे सुरुवातीचे लक्षण असू शकते. 

कधी कधी अचानक घाबरल्यासारखे वाटते. परिश्रमाचे काम न करता हि प्रचंड घाम येतो. हृदयविकाराचा झटका येण्याआधी स्त्रियांमध्ये बऱ्याचदा घशात आणि जबड्यात वेदना आणि सूज येते.

डोक गरगरल्या सारखे वाटते, अचानकपणे चक्कर हि येऊ शकते. वरती दिलेल्या लक्षणापैकी आपल्यामध्ये तीन पेक्षा जास्त लक्षण जर जाणवत असतील तर आपण आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घ्या.

आपल्याला स्त्रियांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याआधी हि लक्षणे दिसून येतात ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *