- आरोग्य

भाजणे, जळणे वेदना कमी करण्यासाठी तसेच जखम लवकर बरी होण्यासाठी घरगुती उपाय

शरीराच्या कोणत्याही भागास भाजने खूप वेदनादायक असत. स्वयंपाक करताना, गरम पाण्याने भाजल्यास कधी कधी त्वचेवर फोड येतात. ज्यामुळे आपली अस्वस्थता अनेक पटीने वाढते.

स्त्रिया किचनमध्ये काम करत असताना घाई गडबडीमध्ये त्यांच्या हाताला भाजण्याचे प्रमाण जास्त असते. भाकरी करताना कायम अशा घटना बऱ्याच घरांमध्ये घडतात. भाजले असल्यास त्याचे डाग लवकर जात नाहीत. त्यामुळे त्यावर उपचार करणे गरजेचे आहे.

याच्या वेदना असह्य होण्यासारखा असतात. त्यामुळे अशा जखमावर त्वरित घरगुती उपचार घेणे आवश्यक असते. आपल्या किचनमध्ये अनेक अशा छोट्या गोष्टी आहेत ज्यामुळे आपल्याला भाजले असता त्वरित उपचार मिळू शकतात. आज अशाच काही गोष्टींविषयी जाणून घेऊयात.

जेव्हा कोणत्याही कारणामुळे भाजते तेव्हा त्यावर ताबडतोब थंड पाणी घाला जेणेकरून फोड येऊ नये. यानंतरही कापड थंड पाण्यात भिजवून तो जळलेल्या जागेवर गुंडाळा जेणेकरून जळजळ व आग कमी होईल.

भाजलेल्या  ठिकाणी त्वरित हळदीचे पाणी लावल्यास वेदना कमी होतात व आराम मिळतो. हळद अँटिसेप्टिक असल्याने अधिक प्रभावी आहे. म्हणून याचा वापर प्राथमिक उपचार म्हणून केला जाऊ शकतो.

भाजलेल्या  ठिकाणी बटाटा बारीक करून पेस्ट लावा, ते जळलेल्या भागाला थंडपणाची भावना देईल. आणि त्या ठिकाणी सूज येणार नाही. तुळशीची वनस्पती केवळ अंगणाचे सौंदर्यच वाढवते असे नाही तर ते औषध म्हणून देखील कार्य करते.

तुळशीचा उपयोग भाजले असता ही होऊ शकतो. जळलेल्या त्वचेवर तुळशीचा रस लावल्याने खूप आराम मिळतो. यामुळे जंतूंचा नाश होऊन वेदना निर्माण होत नाहीत.

कोणतेही काम करताना भाजले असल्यास त्या ठिकाणी बर्फ लावा. बर्फापेक्षा स्वस्त आणि चांगले औषध असू शकत नाही. भाजलेल्या जागेवर 10 ते 15 मिनिटे बर्फ लावावा. अशाप्रकारे बर्फ लावल्याने जळजळ कमी होऊन दुखणे कमी होते.

भाजलेल्या ठिकाणी तीळ बारीक करून पेस्ट बनवा आणि लावा. यामुळे जळजळ आणि वेदना होणार नाही. तीळ लावल्याने जळणाऱ्या भागावरील डागही निघून जातात.

भाजलेल्या ठिकाणी मध वापरणे देखील फायदेशीर आहे, कारण ते चांगले अँटीबायोटिक आहे. हे जखमेच्या जंतूंचा नाश करण्यास मदत करते. यासाठी मलमपट्टीवर मध घाला आणि जखमांवर ती पट्टी लावा आणि ही पट्टी दिवसातून दोन ते तीन वेळा बदला.

आपल्याला घसा दुखणे, आवाज बसणे यावर सोपे घरगुती उपाय ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा.

जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *