- आरोग्य

मानेवरील काळसरपणा घालवण्यासाठी प्रभावी घरगुती उपाय

मानेची त्वचा योग्य प्रकारे साफ न केल्यास आणि काळजी न घेतल्यास, आपली मान काळसर दिसू लागते. मानेचा काळेपणा कधीकधी आपल्या चेहर्यारचे सौंदर्य बिघडवतो.

कधीकधी उन्हात बाहेर पडताना आपण आपल्या चेहऱ्यावर सनस्क्रीन लोशन किंवा क्रीम लावतो पण ते मानेवर लावण्यास विसरतो यामुळे मानेची त्वचा काळसर पडते. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत मानेवरील काळसरपणा घालवण्यासाठी प्रभावी घरगुती उपाय.

मानेवरील काळसरपणा घालवण्यासाठी एक चमचा मुलतानी माती, एक चमचा चंदन पावडर आणि एक चिमूटभर हळद आणि एक चमचा दूधामध्ये मिसळून पेस्ट बनवा आणि हलक्या हाताने आपल्या मानेवर लावा. 15 मिनिटे ठेवा, मग ते धुऊन टाका. हा उपाय केल्याने आपल्याला काही दिवसातच फरक दिसेल.

मानेवरील काळसरपणा घालवण्यासाठी एक बटाटा किसून घ्या आणि त्याचा रस काढा. हा रस आपल्या मानेवर लावा. पंधरा मिनिटांनी स्वच्छ पाण्याने धुवा. आठवड्यातून तीन वेळा हा उपाय करा.

मानेवरील काळपटपणा दूर करण्यासाठी आपण साखर, लिंबू आणि पिकलेल्या केळीचा स्क्रब वापरून बघू शकता. यासाठी आपण दोन चमचे साखर एका वाटीत घ्या. त्यामध्ये लिंबू पिळा आणि अर्धी केळी त्यामध्ये टाकून हाताने या तिन्ही गोष्टी मॅश करा.

चांगल्याप्रकारे मिक्स करून झाल्यावर हा स्क्रब आपल्या मानेवर लावा. साधारण 10 मिनिटे राहूद्या. कोमट पाण्याने धुऊन टाका. हा उपाय केल्याने आपल्याला लगेच फरक दिसून येईल. लिंबामध्ये असणाऱ्या विटामिन सी मुळे मानेवरील काळपट डाग निघायला मदत मिळते. साखर आणि केळं आपल्या मानेला उजळपणा देण्याचे काम करतात.

मानेवरील काळसरपणा घालवण्यासाठी एक पिकलेले टोमॅटो मिक्सरमध्ये बारीक करून घ्या त्यामध्ये काही थेंब लिंबू रस मिसळा. नंतर हे मिश्रण आपल्या मानेवर लावा. सुकल्यावर साफ करा. चांगल्या परिणामासाठी आपण हे दिवसातून दोनदा देखील करू शकता.

मानेवरील काळसरपणा घालवण्यासाठी चमचाभर बेकिंग सोडा पाण्यात मिसळून पेस्ट बनवा आणि ही पेस्ट गळ्यावर 15 मिनिटासाठी लावा. असे केल्याने मानेवरील काळसरपणा दूर होण्यास मदत होईल.

मानेवरील काळपटपणा दूर करण्यासाठी आपण कोरफडाचा वापर करू शकता. यासाठी थोडासा कोरफडाचा गर हाताने आपल्या मानेवर लावा. हलक्या हाताने चोळा. साधारणपणे 10 ते 15 मिनिटांनी धुऊन टाका. आपली मान मऊ आणि कोमल होईल तसेच मानेचा काळसरपणा हि कमी होईल. कोरफडमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात जे त्वचेमध्ये मेलेनिनचे उत्पादन कमी करण्यास मदत करतात.

आपल्याला मानेवरील काळसरपणा घालवण्यासाठी प्रभावी घरगुती उपाय हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *