- आरोग्य

दात दुखी, दातांमध्ये सळसळ यावर घरगुती उपाय

आपण जे अन्न खातो ते व्यवस्थित चावून खाण्यासाठी आपले दात निरोगी असणे गरजेच असत. आपल्याला हि वाटत असेलच कि आपले दात पांढरे शुभ्र आणि मजबूत असावेत परंतु आपल्या छोट्या छोट्या चुकांमुळे आपले दात किडतात, हिरड्या दुखू लागतात यामुळे मग अन्न खाण ही कठिण होऊन जात म्हणूनच आज आपण जाणून घेऊयात दात दुखी, दातांमध्ये सळसळ यावर आपण कोणकोणते घरगुती उपाय करू शकतो.

दात दुखी होण्याची कारण कोणकोणती असतात हे आपण सर्वप्रथम जाणून घेऊयात. बऱ्याच लोकांना एक सवय असते. आपले दात पांढरे शुभ्र दिसावेत यासाठी ते दात बराचवेळ आणि जोरजोराने घासतात.

जोराजोराने दात घासल्याने दातांवरील सुरक्षाकवच (इनॅमल) कमी निघून जात. यामुळे आपण अति गरम व थंड पदार्थ खाल्ले कि आपल्या दातांना ते सहन होत नाही. दाताना झिन झिन्या येतात.

काही लोकांना दात चावण्याची सवय असते. दात चावल्याने दातांच्या आतमध्ये असणाऱ्या नसांना त्रास होऊन दात दुखण्याची शक्यता असते. दात दुखी होण्याचे मुख्य कारण दातांची वेळेवर आणि व्यवस्थित सफाई न करणे, अत्यंत कडक असणाऱ्या गोष्टी खाणे.

कधी कधी अपघात झाल्यावर आपल्या दाताना हि इजा पोहचते. दात हिरड्या यांना जखमा होतात. त्यावरील औषध उपचार केल्यावर वरून जखमा बऱ्या होतात. परंतु आतमध्ये असणाऱ्या नाजूक नसाना झालेल्या जखमा बऱ्या व्हायला खूप वेळ लागतो.

दरम्यानच्या काळात आपण कडक असणाऱ्या गोष्टी खाल्या, जोर जोराने दात घासले तरी सुद्धा ह्या वेदना परत सुरु होतात. म्हणूनच अपघातात आपल्या दाताना इजा पोहोचली असल्यास आपण औषध उपचार केल्यावर हि आपण कडक असणाऱ्या गोष्टी न खाणे आपल्या दातांच्या आरोग्यासाठी चांगले राहील. आता आपण जाणून घेऊयात दात दुखत असल्यावर कोणकोणत्या गोष्टी करता येऊ शकतात.

आपल्या तोंडात असलेले जीवाणू दातावर साठून राहिलेल्या अन्नकणांमधल्या साखरेवर प्रक्रिया करून ऍसिडयुक्त घटक तयार करतात आणि या ऍसिडमुळे दाताच्या पृष्ठभागावरचे आवरण ज्याला इनॅमल असे म्हणतात ते विरघळायला सुरुवात होते. ही प्रक्रिया हळूहळू पण सतत सुरू राहते.

त्यालाच आपण कीड लागणे अस म्हणतो. यावर सोपा उपाय म्हणजे जेव्हा पण आपण गोड पदार्थ खाऊ त्याच्या नंतर चांगल्याप्रकारे चूळ भरा. जेणेकरून आपल्या तोंडात अन्न कण राहणार नाही.

दात दुखत असल्यावर एक चमचा ओवा भाजून बारीक करून पाण्यात दहा ते मिनटे भिजवा नंतर ते पाणी गाळून घ्या ह्या पाण्याने चूळ भरा. ओव्यामध्ये असणाऱ्या थायमॉल घटकांमुळे आपल्या दातांची वेदना कमी व्हायला मदत मिळते.

दातांचे आरोग्य सुधारण्यास मदत मिळते. हा उपाय केल्याने भविष्यातील हिरड्यांचे आजार आणि दात किडण्याची समस्या कमी होते. दातदुखी आणि दाढदुखी हे दोन्ही असह्य असते.

अशा वेळी आपण हा सोपा उपाय करू शकता. यासाठी थोडेसे लवंग तेल कापसाच्या बोळ्यावर घ्या आणि आपला दात किंवा दाढ ज्या ठिकाणी दुखत आहे. त्याठिकाणी ठेवा. दिवसातून तीन ते चार वेळा हा उपाय केल्याने वेदना आणि सूज कमी होईल.

लवंग तेलामध्ये असणाऱ्या युजेनॉल या घटकामुळे आपली दात आणि दाढ दुखी कमी होते. (हा उपाय करताना एक काळजी घ्या. आपण जे लवंग तेल कापसाच्या बोळ्यावर लावले आहे ते पोटात गेले नाही पाहिजे.)

दात दुखी कमी करण्यासाठी आपण मिठाच्या पाण्याने गुळण्या हि करू शकता. दातांची सळसळ कमी होण्यासाठी लसणाची पेस्ट दुखणाऱ्या भागावर ठेवा. लसणामध्ये असणाऱ्या घटकांमुळे सळसळ कमी व्हायला मदत मिळते.

या प्राथमिक उपायांनी आपली दात दुखी न थांबल्यास आपण आपण दातांच्या डॉक्टरांची मदत घेऊ शकता. दात दुखू नये, त्यांना कीड लागू नये यासाठी आपण पुढील गोष्टी करू शकता.

नियमित दात घासा. त्यासाठी आपण योग्य असा ब्रश वापरा. दात घासायच्या वेळी आपली जीभ हि स्वच्छ करा. जेवण केल्यानंतर चूळ भरायला विसरू नका. अति थंड, अति गरम, टणक पदार्थ खाऊ नका. व्यसने करू नका.

आपल्याला ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा.

जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *