- आरोग्य

रोज 2 भिजवलेले अक्रोड खाण्याचे 10 फायदे

अक्रोड या सुक्यामेव्यामध्ये फायबर, व्हिटामिन्स, प्रथिने, कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयर्न, फॉस्फरस, सेलेनियम, ओमेगा -3 असे आपल्या शरीराला आवश्यक असणारे बरेचशे पोषक घटक असतात. अक्रोडला मेंदूचा खुराक अस म्हणतात.

कारण नियमित अक्रोड खाल्याने आपली स्मरणशक्ती चांगली होते. त्याच बरोबर आपण निरोगी हि राहता. परंतु बऱ्याच जणांना अक्रोड पचायला अवघड जातात म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत. अक्रोड खाण्याची सोपी पद्धत आणि आणि अक्रोड खाण्याचे फायदे

अक्रोड जर भिजवून खाल्ले तर त्याच्या पासून आपल्याला अनेक फायदे मिळतात. यासाठी आपण रात्री एका वाटीत 2 अक्रोड भिजायला ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी त्याचे सेवन करा.

रिकाम्या पोटी अक्रोड भिजवून खाल्यास आपली पाचनशक्ती चांगली होते. अक्रोडमध्ये भरपूर फायबर असतात. ज्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी व्हायला मदत मिळते.

सकाळी रिकाम्या पोटी अक्रोड भिजवून खाल्ले तर अक्रोड रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते, ज्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो. रिकाम्या पोटी अक्रोड भिजवून खाल्ल्याने त्यामधील पोषक तत्वांमुळे आपली हाडे मजबूत होण्यास मदत मिळते.

अक्रोड भिजवून खाल्ल्याने अक्रोडमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स शरीरातील कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखतात. आणि आपल्याला कर्करोगापासून वाचवतात.

सकाळी रिकाम्या पोटी अक्रोड भिजवून खाल्याने आपल्या शरीरामधून खराब कोलेस्टेरॉल कमी होऊन चांगले कोलेस्टेरॉल तयार करण्यास मदत मिळते. जे आपल्या हृदयासाठी चांगले असते.

अक्रोडमध्ये अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात. ज्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी अक्रोड भिजवून खाल्याने प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. सकाळी रिकाम्या पोटी अक्रोड भिजवून खाल्याने पुरुषांच्या शरीरातील शुक्राणूंचा आकार, गतिशीलता चांगली होते.

आपल्याला भिजवलेले अक्रोड खाण्याचे फायदे ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा.

जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा.

इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *