- आरोग्य

भूक वाढविण्यासाठी घरगुती उपाय

भूक न लागणे ही अनेकांची तक्रार असते. पोषक घटक आपल्या शरीराला न मिळाल्यामुळे आरोग्याच्या तक्रारींना आपल्याला सामोरे जावे लागते. धावपळ, मानसिक टेन्शन, हार्मोनल असंतुलन यामुळे देखील जेवण जात नाही. परंतु त्याचा दुष्परिणाम आपल्या शरीरावर होत असतो.

त्यामुळे जेवणाकडे दुर्लक्ष करू नका. आपल्या शरीराची वाढ योग्य पद्धतीने होऊन शरीरासाठी आवश्यक पोषक घटक मिळणे गरजेचे आहे. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत भूक वाढवण्यासाठी काही घरगुती उपाय

जर तुमच्याकडे पुरेसा वेळ असेल तर तुम्ही सकाळी लवकर उठून व्यायाम करा. शारीरिक हालचाल नसल्यामुळे देखील भूक मंदावते. सकाळी उठून चालणे, योगासने करणे, धावणे, सायकल चालवणे या क्रिया आपली भुक वाढवण्यासाठी मदत करतात.

पचन क्रिया नीट नसेल तर आपल्याला भूक लागत नाही. अशा वेळी जेवण झाल्यानंतर ओवा, जिरे अथवा बडीशोप चघळा. कच्चे खाण्यास तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही हे भाजून देखील खाऊ शकता. त्यामुळे तुमची पचनक्रिया नीट होईल आणि भूक देखील वाढेल.

खाण्याची इच्छा होत नसल्यास आपल्या आवडीचे पदार्थ खा. यामुळे आपली खाण्याची इच्छा होईल. भूक वाढविण्यासाठी आले किसून त्याचा रस काढा. एक ग्लास गरम पाण्यात एक चमचा आल्याचा रस आणि मध मिसळून दिवसातून दोन वेळा प्या.

असे केल्याने आपल्याला जेवण करायची इच्छा होईल. भूक वाढीसाठी आपण चिंचेचा वापर करू शकता. चिंचेमध्ये व्हिटॅमिन-बी 1 म्हणजेच थायामिन आढळत, जे आपली भूक वाढवण्यास मदत करू शकत. भूक वाढीसाठी आपण दिवसातून दोन वेळा थोडीशी चिंच खाऊ शकता.

भूक लागण्यासाठी दिवसभरात एकदा तरी ताक प्या. ताक प्यायल्याने आपल्या तोंडाला चव येईल आणि आपल्याला भूक लागेल. भूक लागण्यासाठी आपण आवळ्याचा रस प्या. आवळ्याचा रस पाचक असतो. तसेच रस प्यायल्याने आपल्याला चांगली भूक लागेल.

भूक वाढीसाठी सर्वात रामबाण उपाय म्हणजे मनुका. तुम्ही मनुके दुधामध्ये भिजून अथवा पाण्यासोबत खाल्ल्यास भूक वाढते. रोज रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यातून घेतल्यास फायदा होतो. त्यामुळे तुमचे पोट साफ होते आणि आपोआप भूक वाढते.

केळी खाल्ल्याने लवकर वजन वाढते. तुमच्या आहारामध्ये एकातरी केळाचा समावेश करा. जर दररोज दोन ते चार केळी खाल्ल्यास लवकर फरक जाणवतो. केळ्यामध्ये कॅलरीज, पोटॅशियम हे घटक असतात. जे शरीराला ऊर्जा स्त्रोत, एनर्जी देण्यासह वजन वाढीसाठी देखील फायदेशीर आहेत.

बटाटा हा प्रत्येक घरात उपलब्ध असतो. रोज सकाळी 2 बटाटे उकडून खाल्ल्याने भूक वाढते. बटाट्यामध्ये कायब्रोहायड्रेट, शुगर असते. ही तुमची भूक वाढवते. शक्यतो तळलेले बटाटे न खाता उकडलेले बटाटे खाल्ल्याने जास्त फायदा होतो.

आपल्याला भूक वाढविण्यासाठी घरगुती उपाय ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा.

जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *