- आरोग्य

काखेत लालपणा, खाज सुटणे, पुरळ उठणे, त्वचेला काळे पडणे यावर घरगुती उपाय

अंडरआर्म हा आपल्या शरीराचा एक नाजूक भाग आहे. अंडरआर्ममध्ये खाज येण्याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या काखेत सगळ्यात जास्त घाम येत असतो. काखेत येणारी लव काढण्यासाठी आपण काही प्रसाधने वापरतो, वॅक्स करतो यामुळे हि खाज येऊ शकते.

बऱ्याचदा घामाच्या दुर्गंधापासून वाचण्यासाठी आपण वेगवेगळे केमिकलयुक्त डियोड्रेंट वापरतो यामुळे सुद्धा आपल्या काखेत खाज येऊ शकते. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत काखेत खाज येत असल्यास आपण कोणकोणते घरगुती उपाय करू शकतो.

काखेत खाज येत असल्यास रात्री झोपण्याआधी हातावर थोडेसे नारळाचे तेल घेऊन हलक्या हाताने खाज येत असलेल्या जागेवर लावा. रात्रभर राहूद्या. सकाळी धुऊन टाका. हा उपाय काही दिवस केल्याने काखेतील खाज शांत होईल.

काखेत खाज येत असल्यास सकाळी कडूलिंबाची काही पाने बारीक करून पेस्ट बनवा हि पेस्ट खाज येणाऱ्या भागावर लावा. 15 मिनिटे राहूद्या. नंतर आंघोळ करताना धुऊन टाका. ह्या उपायाने आपल्या बगलेत येणारी खाज बंद होईल.

काखेत खाज येत असल्यास तुळशीच्या पानाची पेस्ट करून त्या जागी लावा. अर्धा तास राहूद्या नंतर कोमट पाण्याने धुऊन टाका. या उपायाने आपली खाजेपासून सुटका होईल.

काखेत खाज येत असल्यास एक चमचा बेकिंग सोडा थोड्याश्या पाण्यात मिसळून पेस्ट बनवा. हि पेस्ट आपल्या खाज येणाऱ्या जागेवर लावा. 15 मिनिटे राहूद्या नंतर धुऊन टाका. बेकिंग सोड्यात अँटिफंगल गुणधर्म असतात. जे आपल्या अंडरआर्म्समध्ये येणारी खाज थांबविण्याचे काम करतात. तसेच आपल्या काखेत पुरळ असतील तर ते सुद्धा नाहीशे होण्यास मदत मिळते.

काखेत खाज येऊ नये यासाठी काही सोप्या टिप्स. आपण जे कपडे घालता ते थोडे ढिले वापरा जेणेकरून आपल्या काखेत जास्त प्रमाणात घाम येणार नाही. याचबरोबर आपण सुती कपडे वापरू शकता.

आपल्या काखेत नियमित मॉईस्चराईज लावा. यामुळे त्वचा मुलायम राहील आणि खाज येणार नाही. काखेतील लव काढण्यासाठी आपण जर दाढी करण्याचा वस्तरा वापरत असाल तर तो चांगल्या अँन्टी सेप्टिक लिक्विडने धुऊन वापरा.

आपल्याला ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *