- आरोग्य

पायांना आलेली सूज घालवण्यासाठी घरगुती उपाय

बराच वेळ एका जागेवर काम केल्याने, जास्त चालल्याने, एका जागेवर जास्त वेळ उभे राहिल्याने, पायात रक्ताच्या गुठळ्या झाल्यास, वजन जास्त वाढल्यास आपल्या पायांना सूज येते. पायांना गोळे येतात.

पायांना सूज आल्यावर आपल्याला दैनंदिन काम करणे हि अवघड होऊन जाते. पायांना आलेली सूज घालवण्यासाठी काही प्राथमिक घरगुती उपाय आज आपण जाणून घेणार आहोत.

जर दोन्ही पायांना सूज आली असेल तर आपण एका टब मध्ये गरम पाणी घ्या त्यामध्ये दोन मोठे चमचे खडे मीठ किंवा सैंधव मीठ टाका. त्यानंतर आपले पाय त्या पाण्यात ठेवून चांगले 15 मिनिटे शेकवा. गरम पाण्यात पाय शेकवल्याने  आपल्या शरीरातील रक्ताभिसरण क्रिया चांगल्या प्रकारे काम करेल. आणि सूज कमी होईल.

पायांवरील सूज कमी करण्यासाठी ऑलिव ऑइल गरम करून त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या टाका. हे तेल कोमट करून हलक्या हातांनी पायांवर लावा. आणि 10 मिनटे चोळा असे केल्याने पायांवर आलेली सूज कमी होण्यास मदत होईल.

पायांवरील सूज कमी करण्यासाठी थोडेसे मोहरीचे तेल किंचित गरम करा. रात्री झोपण्यापूर्वी, सुजलेल्या दहा मिनिटे हलक्या हाताने मालिश करा. मोहरीच्या तेलाने मालिश केल्याने वेदना कमी होऊन सूज कमी व्हायला मदत होईल.

आपल्याला पायांना आलेली सूज घालवण्यासाठी घरगुती उपाय ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *