- आरोग्य

सकाळी “मेथीदाण्यांचे पाणी” पिण्याचे आरोग्यदायी फायदे

हिरव्या पालेभाज्या खाल्या पाहिजेत त्यामध्ये अनेक पोषक घटक असतात हे आपल्याला माहितच असेल. अश्याच भाज्यांपैकी आपल्या आवडीच्या मेथीच्या भाजी बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

मेथीच्या हिरव्या पानापासून आपल्याला अनेक फायदे मिळतात. मेथी दाण्यांचा वापर बऱ्याचश्या औषध आणि सौंदर्यप्रसाधनामध्ये केला जातो. तसेच मेथीच्या दाण्यांमध्ये अनेक पोषक तत्त्वे आढळतात जी आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात.

मेथीमध्ये प्रथिने, फायबर, कॅल्शियम, आयर्न, फॉस्फरस, पोटॅशियम, जस्त, मॅंगनीज, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी, सोडियम असे घटक असतात. मेथी दाण्यांचा वापर अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या आरोग्य समस्यांपासून मुक्त होण्यासाठी केला जातो.

मेथीदाण्यांचे पाणी कसे बनवतात हे आपण पहिले बघुयात. एका मोठ्या वाटीत कपभर पाणी घ्या त्यामध्ये दीड ते दोन चमचे मेथी दाणे टाका. रात्रभर राहूद्या सकाळी हे पाणी ब्रश केल्यानंतर प्या.

आणि त्यातील थोडेसे मेथीचे दाणे खा. (सगळे दाणे खाऊ नका) सकाळी नियमित मेथीदाण्यांचे पाणी प्यायल्याने आपल्याशरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. आपण वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर आपण मेथीदाण्यांचे पाणी प्यायल्या सुरवात करा.

मेथीदाण्यांचे पाणी प्यायल्याने आपली चयापचय शक्ती सुधारण्यास मदत मिळते. आपल्या शरीरातील वाढलेले कोलेस्ट्रोल कमी होते. शरीर आतून स्वच्छ होते. मधुमेहाचा त्रास असल्यास आपण सकाळी मेथीदाण्यांचे पाणी प्यायल्याने आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित व्हायला मदत होईल.

सकाळी मेथीदाण्यांचे पाणी प्यायल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास कमी व्हायला मदत होईल. स्त्रियांनी काही दिवस मेथीदाण्यांचे पाणी प्यायले तर त्यांना मासिकपाळी दरम्यान होणारा त्रास कमी होईल.

सकाळी नियमित मेथीदाण्यांचे पाणी प्यायल्याने आपल्या चेहऱ्यावर चमक येईल. चेहऱ्यावरील मुरूम, डाग कमी होतील. मेथीदाण्यांचे पाणी प्यायल्याने आपल्याला चांगली भूक लागेल.

सकाळी मेथीदाण्यांचे पाणी प्यायल्याने केस दाट चमकदार आणि मजबूत होतील. केस गळणे कमी होईल. पुरुषांनी मेथीदाण्यांचे पाणी प्यायल्याने त्यांची शारीरिक कमजोरी दूर होईल. शुक्राणूंची संख्या वाढेल.

आपल्याला सकाळी “मेथीदाण्यांचे पाणी” पिण्याचे आरोग्यदायी फायदे ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा.

जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *