- आरोग्य

रक्तातील प्लेटलेट जलदगतीने वाढवण्यासाठी घरगुती उपाय

आपल्या सगळ्यांच्या शरीरामध्ये रक्त आहे. त्या रक्तामध्ये तीन प्रकारच्या पेशी असतात. पांढऱ्या पेशी, लाल रक्तपेशी आणि प्लेटलेट आज आपण प्लेटलेट विषयी अधिक माहिती घेणार आहोत. प्लेटलेट ह्या दिसायला प्लेट सारख्या असतात म्हणून त्यांना प्लेटलेट अस म्हणतात. हे कारण वाचून तुम्हाला हि हसू आल असेल! पण हे खर आहे.

आपल्या शरीरातील रक्त पातळ असत त्यामुळे जखम झाल्यास ते त्यातून प्रवाहीत होत. आणि प्रवाहीत झालेलं रक्त थांबवण्याच काम प्लेटलेट करतात. म्हणजेच रक्तस्राव अधिक प्रमाणात होऊ न देण्याचं काम प्लेटलेट करतात.

निरोगी माणसाच्या शरीरामध्ये साधारणपणे प्रति मायक्रोलीटर दीड लाख ते साडे चार लाख इतक्या प्रमाणात प्लेटलेट असणे गरजेच असत. प्लेटलेटची पातळी कमी झाल्यास आपल्याला प्रचंड अशक्तपणा येऊ शकतो.

त्याच बरोबर जखम झाल्यास रक्तप्रवाह थांबत नाही अशा बऱ्याचश्या गोष्टी होऊ शकतात. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत. रक्तातील प्लेटलेट जलदगतीने वाढवण्यासाठी घरगुती उपाय.

प्लेटलेट जलदगतीने वाढवण्यासाठी आपण आपल्या आहारामध्ये पपईचा समावेश करू शकता. त्याच बरोबर पपईच्या हिरव्या पानाचा रस काढून तो सकाळी रिकाम्या पोटी अर्धा कप इतक्या प्रमाणात घेऊ शकता.

प्लेटलेटची संख्या खूपच कमी झालेली असेल तर आपण दिवसातून दोन वेळा हा रस घेऊ शकता. प्लेटलेट वाढवण्यासाठी आपण आहारामध्ये डाळींबाचा समावेश करू शकता. रक्तातील प्लेटलेटची पातळी वाढवण्यासाठी दोन ते तीन चमचे मनुके कपभर पाण्यात रात्री भिजयाला ठेवा.

सकाळी उठल्यावर ते पाणी प्या आणि मनुके खाऊन टाका. ह्या उपायाने आपल्या आपल्याला लवकर फरक जाणवेल. प्लेटलेट वाढवण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी एक कपभर गव्हांकुराचा रस एक आठवडाभर घेतल्यास प्लेटलेट पूर्ववत होतात.

प्लेटलेट वाढवण्यासाठी आपण बीटाचा आपल्या आहारात सामावेश करा. बीटामध्ये मोठ्या प्रमाणात अँटी ऑक्सिडेंट असतात. ज्यामुळे बीट खाल्याने किंवा त्याचा रस प्यायल्याने आपल्या शरीरात प्लेटलेट जलदगतीने वाढतात. तसेच हिमग्लोबीन हि वाढण्यास मदत होईल.

प्लेटलेटची संख्या वाढण्यासाठी ह्या उपायांबरोबरच आपल्या शरीरामध्ये पाण्याचे योग्य प्रमाण असणे गरजेचे आहेत त्यामुळे आपण दिवसभरात आठ ते दहा ग्लास पाणी प्यायले पाहिजे.

आपल्याला रक्तातील प्लेटलेट जलदगतीने वाढवण्यासाठी घरगुती उपाय ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा.

जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *