- आरोग्य

ह्या झाडाची 2 पाने खाल्याने आपले डॉक्टरचे लाखोंचे बील वाचवू शकते

पूर्वी आपल्या घराच्या बाहेर तुळशीचे झाड लावलेलं दिसायचं, घराच्या आजूबाजूला कडूलिंबाच झाड हमखास असायचं त्यावर गुळवेल असायचा. ह्या झाडांच्या मदतीने आपले पूर्वज वेगवेगळ्या आजारांचा इलाज करायचे. आपले पूर्वज ह्या झाडांचे आयुर्वेदिक फायदे जाणत होते म्हणून अशी झाड लावली जायची.

परंतु आजकाल बऱ्याचश्या झाडांपासून कोणकोणते फायदे होतात. झाडाच्या अवयवांचा म्हणजेच पान, फुल, मूळ याचा वापर कसा करायचा हे आपल्याला माहित नसल्याने अशी झाड दुर्लभ झालेली आहेत. अशाच एका झाडाबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.

ह्या झाडाचे नाव आहे, पानफुटी यालाच हिंदीमध्ये पत्थरचट्टा अस म्हटल जात. पानफुटी ही देखील एक अशीच औषधी वनस्पती आहे. ह्या झाडाच्या पानांची मदत घेऊन बऱ्याचश्या आजारावर आपण घरच्या घरी उपचार करून बरे होऊ शकता.

आज आम्ही आपल्याला या लेखामधून सांगणार आहोत. ह्या झाडाचे असणारे आरोग्यदायी फायदे. पानफुटीच्या पानांमध्ये अँटीटिबॅक्टेरीअल गुणधर्म असतात. वेगवेगळ्या आजारांवर पानफुटीचा वापर निरनिराळ्या पद्धतीने केला जातो.

आपल्याला शरीरावर कुठे हि कापले असेल, खरचटल असेल जखम झालेली असेल तर जखम लवकर बरी होण्यासाठी पानफुटीची काही पाने गॅसवर गरम करून घ्या. त्यानंतर हाताने ती चुरगळून जखमेवर लावा. नंतर सुती कपड्याने जखम बांधून टाका. ह्या उपायाने जखम लवकर भरून येईल.

बाहेरचे पदार्थ खाल्याने, दुषित पाणी प्यायल्याने बऱ्याचदा आपल्याला अतिसार किंवा जुलाब होतात अशा वेळी आपण पानफुटीच्या पानाचा रस काढून एका वाटीत घ्या. त्यामध्ये अर्धा चमचा जिऱ्याची पावडर आणि अर्धा चमचा तूप मिसळून ते प्या. दिवसातून दोनवेळा हा उपाय केल्याने आपले जुलाब थांबतील.

आपल्याला मुळव्याधीचा त्रास असल्यास पानफुटीची पाने हि त्यासाठी सुद्धा उपयोगी आहेत. ह्या पानाच्या रसाचे सकाळी सेवन केल्याने होणारा त्रास कमी व्हायला मदत मिळते.

आपल्याला मधुमेहाचा त्रास असल्यास सकाळी रिकाम्या पोटी चार ते पाच पानफुटीच्या पानांचा रस काढून तो प्या. ह्या उपायाने आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात येईल. सतत डोकेदुखीचा त्रास असल्यास आपण दोन पानफुटीच्या पानांचा रस दिवसातून दोन वेळा प्या. आपली डोकेदुखी कमी होईल.

रात्री झोपण्याआधी अर्धा कप पानफुटीच्या पानाचा रस आठवड्यातून तीन वेळा प्यायल्याने आपल्या शरीरातील विषद्रव्ये बाहेर निघण्यास मदत मिळेल. रक्तशुद्ध होईल. रक्तदाब नियंत्रणात राहील. प्रतिकारशक्ती वाढेल.

शरीरामध्ये उष्णता वाढली असल्यास, सारखी सारखी उन्हाळी लागण्याचा त्रास होत असल्यास दिवसातून दोन वेळा पानफुटीच्या पानाचा रस प्या किंवा पाने खा. आपल्याला आराम मिळेल.

आपल्याला मुतखडा म्हणजेच किडनीस्टोननचा त्रास असेल तर आपण नियमितपणे सकाळी पानफुटीच्या पानाचा रस एक महिनाभर प्या ह्या उपायाने आकाराने लहान असणारे खडे लघवीवाटे निघून जातील. आणि आकाराने मोठे असणारे खडे विरघळून बारीक होतील. हि क्रिया होण्यासाठी वेळ लागू शकतो.

बऱ्याचवेळा हे झाड आपल्याला दिसले हि असेल पण याचे असणारे फायदे आपल्याला माहित नसल्याने आपण ते काढून हि टाकले असेल. आता आपल्याला या झाडाचे असणारे फायदे माहिती झाले आहेत त्यामुळे आता घरातील कुंडी मध्ये या झाडाची लागवड करायला हरकत नसावी.

आपल्याला पानफुटीच्या पानांचे आरोग्यदायी फायदे ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *