- आरोग्य

ओठांचा काळेपणा घालवण्यासाठी घरगुती उपाय

ओठांसाठी लिपस्टिक निवड चुकल्यास आपल्याला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात. बऱ्याचदा हलक्या गुणवत्तेच्या लिपस्टिकच्या वापरामुळे आपले ओठांचा रंग काळपट दिसू लागतो. याबरोबरच सूर्याच्या अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे त्वचेला काळेपणा येऊ शकतो.

प्रमाणापेक्षा जादा कॉफी प्यायल्याने हि ओठ काळे दिसू लागतात. ओठ काळपट दिसू लागल्यास फार विचित्र दिसतात. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत. ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय. आपल्या ओठांसाठी लिपस्टिकची निवड करताना नैसर्गिक घटकयुक्त सौंदर्य प्रसाधानाचाच वापर करा जेणेकरून आपल्या ओठांवर त्याचे दुष्परिणाम होणार नाही.

ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी रात्री झोपण्याआधी हातावर थोडेसे ग्लिसरीन घ्या हलक्या हाताने ते आपल्या ओठावर लावा. काही दिवस ग्लिसरीन ओठावर लावल्यास आपल्या ओठावरील काळपटपणा निघून जाईल आणि आपले ओठ कोमल होतील.

ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी आपण बीटाचा वापर करू शकता. यासाठी बीटाचा एक तुकडा 15 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा. नंतर आपल्या ओठावर हलक्या हाताने घासा. चांगल्या परिणामासाठी आठवड्यातून 3 वेळा हा उपाय आपल्याला करायचा आहे.

ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी एक स्ट्रॉबेरी घ्या हाताने तीची पेस्ट बनवा त्यामध्ये थोडासा बेकिंग सोडा मिसळून पेस्ट बनवा.  रात्री झोपण्याआधी हळूवारपणे ही पेस्ट आपल्या ओठांवर लावा, नंतर दुसर्या  दिवशी सकाळी थंड पाण्याने स्वच्छ धुवा. आपल्या ओठावरील काळपटपणा निघून जाईल आणि आपले ओठ कोमल होतील.

ओठांचा काळेपणा घालवण्यासाठी हा सोपा उपाय आपण करू शकता. यासाठी हातावर थोडेसे गुलाबजल घ्या त्यामध्ये थोडेसे मध मिसळून हलक्या हाताने ते आपल्या ओठावर लावा. नंतर हलक्या हाताने चोळा. अर्धा तासाने धुऊन टाका ह्या उपायाने आपल्या ओठावरील काळपटपणा निघून जाण्यास मदत मिळेल तसेच आपले ओठ कोमल होतील.

ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी आपण काकडीच्या रसाचा वापर करू शकता. काकडी व्हिटॅमिन-ए आणि सीचा चांगला स्रोत आहे. म्हणूनच काकडीचा रस आपल्या ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी देखील उपयोगी आहे.

यासाठी अर्ध्या काकडीचा रस काढा आणि थंड होण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवा. थंड झाल्यावर कापसाच्या मदतीने हा रस आपल्या ओठावर लावा. 20 मिनिटे राहूद्या त्यानंतर पाण्याने धुवा. असे केल्याने ओठांचा काळेपणा कमी होण्यास मदत मिळेल.

आपल्याला ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा.

जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *