- आरोग्य

घरच्या घरी सोन्या, चांदीचे दागिने कसे साफ करता येतील?

पुरुषांपेक्षा स्त्रियांना दागिने वापरायची हौस जास्त असते. स्त्रियांना वेगवेगळ्या प्रकारचे दागिने वापरायला आवडत. दागिने वापरणे हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य घटक झालेला आहे. पायातील पैंजण, हातातील कंगण, गळ्यातील हार, मंगळसूत्र, कानातील डूल, पायात जोडवी अश्या बऱ्याच गोष्टी स्त्रिया वापरत असतात.

दागिन्यामध्ये त्यांचे रूप अजून सुंदर दिसते म्हणून त्या वेगवेगळे दागिने वापरत असतात. दागिने मुख्यत सोने किंवा चांदी या धातूचे असतात. सोने, चांदी या धातूंची चमक काही कालावधी नंतर कमी होते.

एखाद्या विशेष प्रसंगी आपल्याला दागिने घालायचे असतील तेव्हा ते नव्यासारखे चमकावेत असत आपल्याला वाटत असत. प्रत्येकवेळी सोनाराकडे जाऊन आपण दागिन्यांना पॉलीश करू शकत नसतो म्हणूनच आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत कि घरच्या घरी चांदीचे दागिने कसे साफ करता येऊ शकतात.

चांदीचे दागिने काही दिवसांनी काळपट दिसू लागतात. त्यांचा काळपटपणा दूर करण्यासाठी एका वाटीत कोमट पाणी घ्या. त्यामध्ये एक चमचा बेकिंग पावडर घाला. नंतर त्यामध्ये आपले दागिने दहा मिनिटे ठेवा. नंतर हलक्या हाताने किंवा टूथब्रशने चोळा आणि स्वच्छ पाण्याने धुऊन टाका. आपले दागीने परत पहिल्यासारखे दिसू लागतील.

चांदीचे दागिने साफ करण्यासाठी आपण व्हिनेगरचा हि वापर करू शकता. टूथब्रशवर थोडेसे व्हिनेगर घ्या आणि ते आपल्या दागिन्यावर लावा. साधारणपणे 15 मिनिटे राहूद्या नंतर हलक्या हाताने चोळून दागिने कोमट पाण्याने धुऊन टाका. असे केल्याने चांदीचे दागिने पहिल्यासारखे चमकू लागतील.

सोन्याचे दागिने साफ करण्यासाठी एका वाटीत कोमट पाणी घ्या त्यामध्ये अर्धा चमचा डीटरजेंट मिसळा. त्यानंतर 15 मिनिटे तसेच राहूद्या नंतर हलक्या हाताने किंवा टूथब्रशने चोळा. आणि साध्या पाण्याने धुऊन टाका. दागिने नाजूक व कलाकुसर केलेले असलेले असतात. त्यामुळे त्यांची सफाई करताना विशेष काळजी घेणे गरजेच असत.

आपल्याला घरच्या घरी सोन्या, चांदीचे दागिने कसे साफ करता येऊ शकतात. ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *