- आरोग्य

स्त्रियांमध्ये होणाऱ्या कॅल्शियम कमीची लक्षणे आणि घरगुती उपाय

स्त्रियांमध्ये कॅल्शियमची कमतरता बऱ्याचदा दिसून येते, वयानुसार त्यांची हाडे आणि सांधे कमकुवत होऊ लागतात. महिलांना दिवसाला 1,000 मिलिग्राम आणि 50 पेक्षा जास्त वयाच्या महिलांसाठी 1200 मिलीग्राम कॅल्शियमची आवश्यकता असते.

कॅल्शियमच्या कमतरतेला हायपोक्लेसेमिया असे म्हणतात. स्त्रियांमध्ये मासिक पाळी, गर्भधारणा, स्तनपान यांच्या दरम्यान शरीरातील कॅल्शियमचा वापर अधिक प्रमाणात होत असतो, म्हणून त्यांना अधिक कॅल्शियमची आवश्यकता असते.

म्हणून बऱ्याचदा स्त्रियांमध्ये कॅल्शियम कमतरता असते. आज आपण जाणून घेणार आहोत स्त्रियांमध्ये कॅल्शियम कमतरता असल्यास कोणकोणती लक्षणे दिसतात आणि कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी आहारामध्ये काय बदल केला पाहिजे.

शरीरातील कॅल्शियमची पातळी कमी झाल्यावर कोणती लक्षणे दिसतात हे आपण सर्वप्रथम समजून घेऊयात. आपल्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता असल्यास हाडे आणि सांधे दुखू लागतात.

वयाच्या चाळीशी नंतर स्त्रियांमध्ये सांधेदुखी होण्याचे प्रमाण जास्त असते. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाता पायांना गोळे आल्यासारखे वाटते. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे नखे कमजोर होतात व सारखी सारखी तुटू लागतात. या बरोबरच नखांवर पांढरे डाग हि दिसू लागतात.

शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता असल्यास अकारण केस गळायला लागतात. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे  चिडचिडेपणा वाढतो. थोडस काम केल तरी प्रचंड थकवा आल्यासारखं वाटत.

शरीरातील कॅल्शियमची पातळी वाढवण्यासाठी आपण आपल्या जीवनशैलीमध्ये आणि आहारामध्ये पुढील बदल करू शकता. आपल्या आहारात दुध आणि दुग्धजन्य पदार्थ, हिरव्या पालेभाज्या, तीळ, बदाम, संत्री, पनीर, सोयाबीन अशा कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश करा.

दररोज किमान 30 मिनिटे कोवळ्या सूर्यप्रकाशामध्ये थांबा, जेणेकरून आपले शरीर कॅल्शियम शोषून घेईल. आपल्या रोजच्या आहारात जंक फूड, फास्ट फूड आणि प्रक्रिया केलेले पदार्थ अशा गोष्टी असतील तर त्या खाणे थांबवा.

आपल्याला स्त्रियांमध्ये होणाऱ्या कॅल्शियम कमीची लक्षणे आणि घरगुती उपाय ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *