- आरोग्य

त्वचेवर मऊ गाठी (लिपोमा) येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

लिपोमा म्हणजे एक प्रकारची न दुखणारी चरबीची गाठ असते. आपल्या बोटाने स्पर्श केल्यावर मऊ लागते. जी आपल्या खांद्यावर, हातावर, मानेवर, पाठीवर, पायाला अशी शरीरावर कुठे हि येऊ शकते. लिपोमा आपल्या शरीरावर आल्यावर सहसा काही त्रास होत नाही.

परंतु दिसायला ते खराब दिसते. म्हणून बऱ्याचदा ऑपरेशन करून या गाठी काढल्या जातात. या गाठी प्राथमिक अवस्थेत असताना आपण त्यावर काही घरगुती उपाय करून त्यांची वाढ थांबवू शकता. चला तर जाणून घेऊयात लिपोमा या आजाराबद्दल

सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात त्वचेवर लिपोमा येण्याची कारणे कोणकोणती असतात. मुख्यत त्वचेवर लिपोमा येणे हे अनुवांशिक आहे. मात्र कधी कधी एखाद्या जखमेमुळे, प्रमाणापेक्षा जास्त वजन वाढल्याने, यकृताचा आजार असल्यास, अति म’द्य’पा’न करत असल्यास आपल्या त्वचेवर लिपोमाच्या गाठी येऊ शकतात. आता जाणून घेऊयात या गाठी प्राथमिक अवस्थेत असताना आपण त्यावर कोणकोणते घरगुती उपाय करू शकतो.

लिपोमाची गाठ कमी करण्यासाठी आपण त्या भागावर नारळाच्या तेलाने हलक्या हाताने मालिश करू शकता. मालिश केल्याने रक्त प्रवाह वाढून गाठ कमी होण्यास मदत मिळेल. आपल्या शरीरावरील चरबीच्या गाठी कमी करण्यासाठी आपण नियमितपणे सकाळी एक मोठा ग्लास गरम पाण्यात चमचाभर लिंबाचा रस मिसळून प्या.

लिंबाचा रस गरम पाण्यासोबत प्यायल्याने त्यामध्ये असणाऱ्या एंटी इंफ्लेमेटरी गुणधर्मामुळे रक्ताभिसरण चांगल्याप्रकारे होत तसेच शरीरामधील विषारी घटक लघवी आणि मलनिस्सारणाद्वारे बाहेर टाकले जातात. शरीरामधील रक्तशुद्धीकरण प्रक्रियेला वेग मिळतो. परिणामी चरबीच्या गाठी, शरीरातील अतिरिक कोलेस्ट्रोल कमी होत.

चरबीच्या गाठी कमी करण्यासाठी नियमितपणे कोवळ्या उन्हामध्ये सूर्यनमस्कार घातले पाहिजेत. सूर्यनमस्कार घातल्याने आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी व्हायला मदत मिळते.

अन्न पाचनक्रिया चांगल्याप्रकारे होते, शरीरामधील कोलेस्ट्रोल कमी होते, वजन नियंत्रणात राहते, हृदय निरोगी राहते, दिवसभर मन प्रसन्न राहते. या बरोबरच आपल्या शरीरावर चरबीच्या गाठी येत नाही. आलेल्या गाठींची वाढ होण थांबते.

चरबीच्या गाठी कमी करण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यासोबत त्रिफळा चूर्ण एक चमचा आणि रात्री झोपण्याआधी एक चमचा कोमट पाण्यासोबत अश्या प्रमाणात नियमितपणे 21 दिवस घ्या. त्रिफळा चूर्ण घेतल्याने आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी व्हायला मदत मिळते.

आपल्या शरीरावरील चरबीच्या गाठी कमी करण्यासाठी आपण साधा आहार घेतला पाहिजे. तेलकट, मसालेदार, मैदायुक्त पदार्थ खाणे टाळले पाहिजे. वेळेवर जेवण करणे, रात्रीचे जागरण करणे टाळले पाहिजे. जेणेकरून आपल्या शरीरामध्ये अतिरिक्त चरबी निर्माण होणार नाही. चरबीच्या गाठीना हात लावल्यावर वेदना होत असल्यास आपण डॉक्टरांची मदत घेतली पाहिजे.

आपल्याला त्वचेवर मऊ गाठी (लिपोमा) येण्याची कारणे आणि घरगुती उपाय ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा.

जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *