- आरोग्य

स्त्रियांमध्ये लोहाची (आयरन) कमतरता असण्याची लक्षणे आणि लोह वाढण्यासाठी घरगुती उपाय

आपल्या शरीरामध्ये एखाद्या पोषक घटकाचे प्रमाण कमी झाले तर वेगवेगळ्या प्रकारचे आजार उद्भवू लागतात. आपल्या शरीराला योग्य प्रमाणात सर्व जीवनसत्त्वे, खनिजे आणि पोषक तत्त्वे आवश्यक असतात.

आपण घेत असलेल्या आहारामधून बऱ्याचदा शरीराला आवश्यक असणारे पोषक घटक न मिळाल्याने आपल्याला बऱ्याचश्या आजारांना सामोर जाव लागत. रक्तामध्ये ऑक्सिजन वहन करण्यासाठी आवश्यक असणारे हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी लोह गरजेचे असते.

आपल्या चयापचय प्रणालीमध्ये लोहाचा अभाव असल्यास आपल्या शरीराला आवश्यक उर्जा मिळत नाही. शरीरामध्ये लोहाची कमतरता झाल्यास रक्त कमी होण्याचा धोका असतो. विशेषत स्त्रियांना ग’र्भधारणे दरम्यान, मुल जन्माला आल्यानंतर, मा’सिकपाळीमुळे लोहाची कमतरता होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर पहायला मिळत.

म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत स्त्रियांमध्ये आयरनची कमतरता असण्याची लक्षणे कोणकोणती असतात आणि लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी आपण आहारामध्ये काय बदल करू शकता. सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात स्त्रियांमध्ये आयरनची कमतरता असण्याची लक्षणे कोणकोणती असतात.

आपल्या शरीरामध्ये लोहाची कमतरता असल्यास आपल्याला मोठ्या प्रमाणावर अशक्तपणा जाणवू शकतो. हात पाय रक्त कमी झाल्यामुळे पिवळसर दिसू लागतात. थोडस काम केल तरी आपल्याला थकवा जाणवू लागतो. अशक्तपणा आल्यामुळे श्वास घ्यायला हि त्रास होऊ शकतो.

चक्कर आल्यासारखे वाटत, हात, पाय, अंग दुखू लागत, चेहरा फिक्कट पडतो, सुस्ती आल्यासारखे वाटते, डोकेदुखी, चिडचिड करणे, भूक न लागणे, हात, पाय थंड पडणे अशी लक्षणे जाणवू लागतात.

आता आपण जाणून घेऊयात स्त्रियांमध्ये आयरनची कमतरता दूर करण्यासाठी आहारामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश केला पाहिजे. आपल्या आहारामध्ये बीटाचा समावेश करा. बीट खाल्याने लवकर रक्त वाढायला मदत मिळते.

डाळींबामध्ये रक्त वाढवणारे पोषक घटक असतात. रक्त वाढवण्यासाठी आपण डाळींबाचे सेवन करू शकता. आपल्या आहारात हिरव्या पालेभाज्या जसे कि पालक, मेथी, तांदुळजा यांचा समावेश करा.

सकाळच्या नाश्त्यासोबत थोडासा गूळ आणि मुठभर शेंगदाणे खाल्ल्याने आपल्या शरीरातील रक्ताची कमतरता दूर होईल. मात्र आपल्याला मधुमेहाचा त्रास असल्यास गुळ खाणे टाळा.

आयरनची कमतरता दूर करण्यासाठी मोड आलेल्या कडधान्याचा आपल्या आहारात समावेश करा. आहारामध्ये दुध आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करा. रात्री झोपण्याआधी चार ते पाच बदाम दुधासोबत खा. अथवा दुधामध्ये भिजवून खा. लिंबूवर्गीय फळांचा आहारात समावेश केल्याने आयरनची कमतरता दूर व्हायला मदत होईल.

आपल्याला स्त्रियांमध्ये लोहाची (आयरन) कमतरता असण्याची लक्षणे आणि लोह वाढण्यासाठी घरगुती उपाय ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *