- आरोग्य

निद्रानाश, डोकेदुखी, तणाव आणि सायनस घरगुती उपाय

बदलेली जीवनशैली, दिवसभर कामात व्यस्त असल्याने कॉफीचे अति सेवन केल्याने या आणि अशा कारणांनी रात्री झोप न लागण्याची समस्या सुरु होते. रात्री व्यवस्थित झोप न झाल्याने दिवसभर डोकेदुखी, तणाव यायला सुरुवात होते.

ह्या गोष्टींकडे वेळीच लक्ष न दिल्यास समस्या गंभीर होऊन सायनस सारखा आजार होऊ शकतो. आज आपण सोप्या भाषेत समजून घेऊयात रात्री झोप लागण्यासाठी काय करता येऊ शकत त्याच बरोबर तणाव कमी करण्यासाठी काय करता येईल.

डोकेदुखी थांबवण्यासाठी कोणकोणते घरगुती उपाय करता येऊ शकतात. या शिवाय सायनस हा आजार कसा टाळता येऊ शकतो हे सगळ समजून घेऊयात. रात्री व्यवस्थित झोप न झाल्यास अन्नाचे पचन नीट होत नाही.

सकाळी पोट व्यवस्थित साफ होत, छातीत जळजळ होते. एसिडीटी वाढते या सगळ्या गोष्टीमुळे आपोआपच चीडचीड व्हायला लागते. म्हणूनच रात्री व्यवस्थित आणि चांगली झोप येण्यासाठी आपण झोपण्यासाठी एक ठराविक वेळ ठरवा. रात्री हलका आहार घ्या.

झोप येत नसेल तर पुस्तक वाचा किंवा संगीत ऐका. झोपायच्या आधी टीव्ही, कॉम्प्युटर, मोबाईल अशा गोष्टींचा वापर करू नका. झोप येण्यासाठी एक ग्लास कोमट दुधात चिमुटभर वेलची पूड किंवा जायफळ पूड मिसळून प्या. असे केल्याने आपल्याला लवकर झोप येईल.

साधारणपणे सहा ते आठ तास झोप आपल्या शरीराला दिवसभर कार्यरत ठेवण्यासाठी गरजेची असते. सकाळी झोपेतून उठल्यावर योग, प्राणायाम आणि ध्यान असे शारीरिक आणि मानसीक व्यायाम करा. यामुळे अन्नाचे पचन चांगल्याप्रकारे होते.

डोके दुखत असल्यास हातावर थोडेसे लवंग तेल घेऊन ते आपल्या कपाळावर आणि ज्या ठिकाणी वेदना होत आहेत त्या ठिकाणी लावा. लवंग तेलाच्या वासाने आणि त्यामधील औषधी गुणधर्मामुळे आपली डोकेदुखी थांबेल.

डोकेदुखीमुळे डोक्याच्या पेशींमध्ये आलेली सूज कमी करण्यासाठी एक चमचा आल्याची पेस्ट बनवून त्यामध्ये दोन चमचे पाणी मिसळून ती पेस्ट कपाळावर लावा. काही वेळानंतर कोमट पाण्याने धुवून टाका. आपल्याला आराम मिळेल.

तणाव कमी करण्यासाठी आपण सकाळी दीर्घ श्वास घेण्याची सवय लावू शकता. यासाठी आपल्याला श्वासवर लक्ष केंद्रीत करायचे असते. आपले वाढलेले हृदयाचे ठोके कमी करण्याठी दीर्घ श्वास घेणे फायदेशीर आहे. दीर्घ श्वास घेतल्याने शरिरात ऑक्सिजनचे प्रमाण वाढते.

त्यामुळे आपल्या मनाला शांत वाटते. आपल्या शरीरातील स्नायूंवरील ताण कमी होण्यास मदत होते. याच बरोबर तणाव कमी करण्यासाठी आपल्या मित्र-मैत्रीणींसोबत गप्पा मारा. त्यामुळे मनावरील ताण कमी व्हायला मदत मिळते.

सायनसचा त्रास होत असल्यास नाकाचं हाड, गाल आणि डोळयांच्या आजूबाजूला आणि डोळे हि दुखू लागतात. वातावरणातील बदल त्यासोबत वाढणार प्रदुषण यामुळे सायनसची समस्या होत असते. सायनस पासून आराम मिळवण्यासाठी दिवसभरात गरम पाणी, फळांचे ज्यूस, नारळ पाणी यांचे सेवन करा.

कामावरून आल्यानंतर आपल्या नाकात आणि गळ्यामध्ये जमलेली धूळ आणि मातीचे कण साफ होण्यासाठी निलगिरी तेलाचे काही थेंब टाकून गरम पाण्याची वाफ घ्या. सायनसचा त्रास कमी करण्यासाठी आपण सकाळी एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा हळद टाकून काही दिवस पिऊ शकता. हळदीमध्ये असणाऱ्या अँटी इंफ्लेमेटरी गुणधर्मामुळे सायनस इन्फेक्शन कमी व्हायला मदत मिळते.

आपल्याला निद्रानाश, डोकेदुखी, तणाव आणि सायनस घरगुती उपाय ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा.

जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *