- आरोग्य

स्त्रियांमध्ये होणाऱ्या रक्ताच्या कमतरतेची लक्षणे आणि रक्त वाढवण्यासाठी घरगुती उपाय

स्त्रिया घरातील सगळ्यांची काळजी घेत असतात. परंतु त्या स्वताची तितकी काळजी घेत नाहीत. दर महिन्याला येणारी मा’सि’क’पा’ळी, गर्भधारणा, स्तनपान यामुळे स्त्रियांमध्ये रक्ताचे प्रमाण कमी होत असत. शरीरामध्ये पुरेश्या प्रमाणात लाल रक्तपेशी आणि हिमग्लोबीन नसेल तर अशक्तपणा येत असतो.

शरीरातील हिमग्लोबीनची पातळी कमी झाल्याने एनिमिया सारखे आजार होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. बऱ्याच स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या दरम्यान जास्त रक्तस्त्राव होतो. त्यामुळे हि शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी होत असत.

खाण्यापिण्यामध्ये पोष्टिक गोष्टी नसल्याने हि अशक्तपणा येऊ शकतो. म्हणूनच आज आपण रक्त वाढवण्यासाठी घरगुती उपाय जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण स्त्रियांमध्ये होणाऱ्या रक्ताच्या कमतरतेची लक्षणे जाणून घेऊयात

शरीरामध्ये रक्ताची कमतरता असल्यास जीभ, नख आणि पापण्यांच्या आतील बाजूस पांढरेपणा येतो. अचानक चक्कर आल्यासारखं वाटत, झोपल्यावर अंथरुणातून उठू नये अस वाटत.

श्वास घ्यायला त्रास होतो. प्रचंड थकवा आल्यासारखं वाटत. डोक जड झाल्यासारखं वाटत. डोके दुखी होते. हात पाय गार पडतात. आता आपण शरीरातील रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी घरगुती उपाय जाणून घेऊयात.

शरीरातील रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी पालकाच्या भाजीचा आहारात समावेश करा. पालकामध्ये मोठ्या प्रमाणात आयरन असत. त्यामुळे शरीरातली रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी त्याचा खूप फायदा होऊ शकतो.

रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी एक तास आधी एक ग्लास कोमट दुधामध्ये पाच ते सहा काळे मनुके भिजायला घाला. झोपण्यापूर्वी ते दुध प्या. आणि मनुके खाऊन टाका. ह्या उपायाने आपल्या शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढेल.

शरीरातील रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी आहारामध्ये पिकलेल्या केळीचा समावेश करा केळीमध्ये लोह आणि पोटॅशियम हे घटक मोठ्या प्रमाणात असतात. ज्यामुळे रक्त वाढण्यास मदत मिळते.

रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी आपण टोमेटोचा हि आहारात समावेश करू शकता. गुळासोबत चणे खाल्याने हि रक्त वाढण्यास मदत मिळते. शरीरातील रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी आपण बीटाचा समावेश आहारात करू शकता.

मोड आलेले कडधान्य खाल्याने हि रक्ताचे प्रमाण वाढायला मदत मिळते. शरीरातील रक्ताचे प्रमाण राखून ठेवण्यासाठी अन्न लोखंडी भांडयामध्ये शिजवा. यामुळे शरीरातील हिमोग्लोबिन पातळी राखण्यास मदत मिळते. शरीरात रक्ताचे प्रमाण चांगले राहण्यासाठी नियमित व्यायाम करा. दिवस भरात पुरेशे पाणी प्या. दिवसभरात सहा ते आठ ग्लास पाणी प्यायले पाहिजे.

आपल्याला स्त्रियांमध्ये होणाऱ्या रक्ताच्या कमतरतेची लक्षणे आणि रक्त वाढवण्यासाठी घरगुती उपाय ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *