- आरोग्य

“कमी वयात चेहऱ्यावर सुरकुत्या” येण्याची कारणे चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी घरगुती उपाय

बदलेली जीवनशैली, निकृष्ट दर्जाच्या सौंदर्य प्रसाधनाचा वापर, दिवसभर उन्हात काम केल्यामुळे, रात्री पुरेशी झोप न घेण्याची सवय, जेवणाच्या वेळा न पाळण्याची सवय, या अशा गोष्टींमुळे आपल्या चेहऱ्यावर कमी वयातच सुरकुत्या येतात. चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागल्यावर आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य कमी दिसू लागते. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत. चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी घरगुती उपाय.

चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी आपण थोडासा राहणीमानात बदल करणे गरजेचे आहे. आपल्या चेहऱ्याची त्वचा नाजूक असते त्यामुळे चेहऱ्यावर केमिकलयुक्त सौंदर्य प्रसाधने लावणे थांबवा. केमिकलयुक्त प्रसाधनांचा चेहऱ्यावर वापर केल्याने आपल्या त्वचेची नैसर्गिक आद्रता कमी होते, आपली त्वचा कोरडी होते. आणि चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात.

चेहऱ्याची आद्रता टिकून ठेवण्यासाठी दिवसातून दोन वेळा आपला चेहरा पाण्याने धुवा. यामुळे त्वचेची आद्रता टिकून राहील शिवाय आपल्या चेहऱ्यावरील छोटे छोटे धुळीचे कण हि निघून जातील.

आपण चांगली झोप न घेतल्यास तणाव वाढतो. तणावाचा परिणाम आपल्या चेहऱ्यावर हि होत असतो. आपण तणावात असल्यावर चेहरा सुकलेला दिसतो. त्यामुळे तणावापासून दूर राहायचा प्रयत्न करा.

आपल्या रोजच्या आहारात भरपूर फळे आणि हिरव्या भाज्याचा समावेश करा. याबरोबरच जेवणात सॅलड आणि दही यांचा हि समावेश असुद्या. सकाळच्या नाश्त्यामध्ये ड्राय फ्रूट्सचा समावेश करा.

त्वचेची आद्रता टिकून ठेवण्यासाठी दिवसभरात आठ ते दहा ग्लास पाणी प्या. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी आठवड्यातून दोन वेळा चेहऱ्यावर दहा ते पंधरा मिनिटे वाफ घ्या.

सुरकुत्या कमी करण्यासाठी आपण चेहऱ्यावर दही लावू शकता. दह्यामध्ये असणाऱ्या घटकांमुळे आपल्या त्वचेला पोषण मिळते. आपल्या चेहऱ्याची आद्रता टिकून राहते. यासाठी अर्धी वाटी दही घ्या त्यामध्ये थोडेसे मध मिसळा.

त्यानंतर हलक्या हाताने हे मिश्रण आपल्या चेहऱ्यावर लावा. वीस मिनिटे राहूद्या नंतर कोमट पाण्याने चेहरा धुऊन टाका. ह्या उपायाने आपली त्वचा चमकदार होईल आणि सुरकुत्या हि कमी होतील.

आपल्याला “कमी वयात चेहऱ्यावर सुरकुत्या” येण्याची कारणे चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी घरगुती उपाय ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा.

अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *