- आरोग्य

तांब्या पितळेची भांडी चमकवण्यासाठी घरगुती उपाय

आपल्या घरामध्ये तांबे, पितळ,स्टेनलेस स्टील, एल्युमिनीयम, लोखंड अशी वेगवेगळया प्रकारच्या भांडी वापरली जात असतात. सध्या स्टेनलेस स्टीलची भांडी मोठ्या प्रमाणात वापरली जातात. बऱ्याचश्या घरामध्ये तांब्या पितळेची हि जुनी भांडी असतात.

तांब्या पितळेची भांडी मानवी शरीरासाठी फायदेशीर मानली जातात. अशी हि तांब्या आणि पितळेची भांडी सणावाराला किंवा घरामध्ये काही कार्यक्रम असल्यावर वापरली जातात. तांब्या पितळेची भांडी न वापरता जास्त दिवस ठेवल्यामुळे त्यावर काळसरपणा येतो.

आपल्या नेहमीच्या भांडे धुण्याच्या साबणाने हि भांडी निघत नाहीत. आणि घरात हि भांडी साफ करण्यासाठी कोणत्या गोष्टीचा वापर करता येऊ शकतो हे आपल्याला नेमक माहित नसत. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत. तांब्या पितळेची भांडी चमकवण्यासाठी घरगुती उपाय

तांब्या पितळेची भांडी साफ करण्यासाठी थोड्याश्या पिकलेल्या चिंचा घ्या. एका वाटीत घ्या त्यामध्ये थोडेसे पाणी मिसळून 10 मिनिटे भिजू द्या नंतर हाताने भिजवलेल्या चिंचेची पेस्ट आपल्याकडील भांडी घासायच्या स्क्रबवर घ्या आणि भांड्यावर लावा. 10 मिनिटे राहूद्या नंतर हलक्या हाताने चोळून पाण्याने धुऊन नंतर कोरड्या कपड्याने पुसून घ्या आपले भांडे परत नव्या सारखे साफ दिसू लागेल.

तांब्याची भांडी साफ करण्यासाठी आपण व्हाईट व्हिनेगरचा वापर करू शकता. यासाठी एका वाटीत पाणी घ्या त्यामध्ये थोडेसे व्हाईट व्हिनेगर मिसळा. स्क्रबच्या सहाय्याने हे मिश्रण भांड्यावर लावा. आणि हलक्या हाताने चोळून धुऊन टाका. आपले भांडे स्वच्छ दिसू लागेल.

तांब्याची भांडी स्वच्छ करण्यासाठी लिंबाचा देखील वापर केला जाऊ शकतो. यासाठी तांब्याच्या भांड्यावर लिंबाचे काप घासून स्वच्छ पाण्याने धुवा. तांब्याच्या भांड्या चमकू लागतील.

तांब्याची भांडी स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोड्याचा हि वापर करू शकता. एका वाटीत २ चमचे बेकिंग सोडा घ्या त्यामध्ये पाणी मिसळून पेस्ट बनवा स्क्रबच्या सहाय्याने हि पेस्ट भांड्यावर लावा. 10 मिनिटे राहूद्या नंतर पाण्याने धुऊन सुती कपड्याने भांडे कोरडे करा. आपले भांडे स्वच्छ दिसू लागेल.

तांब्याची भांडी स्वच्छ करण्यासाठी आपण केचपचा हि वापर करू शकता. यासाठी एका वाटीत थोडासा केचप घ्या. हाताच्या सहाय्याने तो भांड्यावर लावा. 15 ते 20 मिनिटे तसेच राहूद्या नंतर हलक्या हाताने चोळून धुऊन टाका. आपले भांडी परत पूर्वी सारखे चमकू लागेल.

लक्षात ठेवा तांब्याची भांडी साफ करण्यासाठी कधीही स्टील स्क्रॅच स्क्रबर वापरू नका. यामुळे भांडी खराब होतात. तांब्या पितळेची भांडी साफ केल्यानंतर साफ सुती कपड्याने पुसून कोरडे करा. अन्यथा त्यावर पाण्याचे डाग दिसू लागतात.

आपल्याला तांब्या पितळेची भांडी चमकवण्यासाठी घरगुती उपाय ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *