- आरोग्य

अळूच्या पानाचे औषधी गुणधर्म आणि आरोग्यासाठी फायदे

आपल्या पूर्वजांना वेगवेगळ्या पालेभाज्या, रानभाज्या, झाडांची चांगली माहिती होती त्यामुळे पूर्वी पावसाळ्यात बऱ्याचश्या रानभाज्या, पालेभाज्या खाल्या जायच्या. म्हणूनच ते निरोगी राहायचे आणि दीर्घायुष्य जगायचे परंतु आजकाल आपल्याला बऱ्याचश्या भाज्यांबद्दल माहित नसत ज्यांचा आपल्या आहारात समावेश केल्याने आपण हि निरोगी राहू शकतो.

आज आपण अश्याच एका पालेभाजी बद्दल जाणून घेणार आहोत. ह्या भाजीचे नाव आहे अळू म्हणजेच अरबी आपण याच्या पानाची भाजी किंवा अळूच्या पानाच्या वड्या खाल्या असतील. चला तर जाणून घेऊयात अळूच्या पानाचे औषधी गुणधर्म आणि आरोग्यासाठी फायदे.

अळूच्या पानांमध्ये फायबर, पोटॅशियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम आणि प्रथिने, आयरन या सारखे पोषक घटक असतात. याचबरोबर अळूच्या पानांमध्ये मोठ्या प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्स असतात.

अळूच्या पानाचा आहारात समावेश केल्याने त्यामध्ये असणाऱ्या सोडियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम या पोषक घटकांमुळे रक्तदाब नियंत्रित राहायला मदत मिळते.

अळूच्या पानाचा आहारात समावेश केल्याने इन्सुलिन आणि ग्लुकोजच्या पातळीचे संतुलन राखायला मदत मिळते. म्हणूनच मधुमेहाचा त्रास असलेल्यांनी अळूच्या पानाचे सेवन करणे फायद्याचे असते. अळूच्या पानात मोठ्या प्रमाणात फायबर असल्याने आपली पचनक्रिया चांगली होते.

अळूच्या पानाचा आहारात समावेश केल्याने त्यामध्ये असणारे व्हिटॅमिन-ई आणि व्हिटॅमिन-सी हे दोन्ही घटक आपली रोगप्रतिकार शक्ती सुधारायला मदत करतात.

अळूची पाने डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगली असतात. अळूच्या पानामध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी सारखे पोषक घटक आपली दृष्टी वाढवण्यास मदत करतात. अळूच्या पानाचा आहारात समावेश केल्याने आपली हाडे मजबूत व्हायला मदत मिळते.

आपल्याला अळूच्या पानाचे औषधी गुणधर्म आणि आरोग्यासाठी फायदे ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा.

जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा.

इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *