- आरोग्य

जेवणानंतर या 6 गोष्टी केल्याने वजन वाढत, अन्न पचन व्यवस्थित होत नाही एसिडीटी होते

आपल्या जेवणात पोषक घटक असलेल्या अन्नाचा समावेश केल्यानंतर जोपर्यंत अन्न व्यवस्थित पचत नाही. आपण खालेल्या अन्नाचे पोषक घटक शरीरात शोषले जात नाही तोपर्यंत पोषण प्रक्रिया पूर्ण होत नाही.

त्यामुळेच जेवण केल्यानंतर आपण कोण कोणत्या गोष्टी करणे टाळले पाहिजे या विषयी आज आपण जाणून घेणार आहोत. जेवण केल्यानंतर या काही गोष्टी आपण लगेच केल्या तर आपले वजन वाढत, एसिडीटी होते, पोट फुगत, गॅस होतात, जळजळ होते म्हणूनच इथून पुढे आपण ह्या गोष्टी करणे थांबवू शकता.

जेवण केल्यानंतर आपण लगेच फळांचे सेवन करू नका. असे केल्याने फळांचे पचन व्यवस्थित होत नाही. त्यापासून आपल्या कमी प्रमाणात पोषक घटक मिळतात. जेवणानंतर सुमारे एक तासा नंतर फळांचे सेवन आपण करू शकता. अथवा जेवण करण्याआधी काही वेळ आपण फळ खाऊ शकता.

जेवण केल्यानंतर आपण लगेचच चहा प्यायल्याने आपल्याला एसिडीटीचा त्रास होऊ शकतो. म्हणून जेवण केल्या नंतर लगेचच चहाचे सेवन करणे आपण टाळले पाहिजे.

अन्न हे जेवढी आपल्याला भूक आहे तेवढेच खाण्याचा प्रयत्न करा प्रमाणापेक्षा जास्त अन्न खाल्याने अपचन होऊ शकते. जेवण केल्यानंतर लगेच पाणी पिणे टाळा. चांगल्याप्रकारे पाचक रस निर्माण होण्यासाठी जेवण करण्याआधी एक ग्लास पाणी आपण पिऊ शकता. तसेच जेवण केल्यानंतर वीस ते पंचवीस मिनिटांनी आपण पाणी प्यायले पाहिजे.

जेवण केल्यानंतर लगेचच धुम्रपान करणे टाळा. जेवण केल्यानंतर लगेचच झोपणे टाळा. तसे केल्याने अन्न पचन व्हायला अधिक वेळ लागतो. खाल्यानंतर लगेच झोपल्याने आपले वजन वाढू शकते. गॅस होऊ शकतात.

आपल्याला जेवणानंतर लगेचच कोणकोणत्या गोष्टी करणे टाळले पाहिजे ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा.

जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *