- आरोग्य

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी या 5 औषधी वनस्पतीचा करा वापर

डायबेटीस हा असा आजार आहे जो आपल्या एकदा झाला कि संपूर्ण आयुष्यभर तो आपल्या सोबत राहतो. डायबेटीसचा त्रास असल्यास एक तर आपल्या रक्तामध्ये साखरेचे प्रमाण वाढलेल असत किंवा कमी झालेलं असत. आज आपण अशा काही औषधी वनस्पतींबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांच्या मदतीने आपण टाइप 2 डायबेटीस या आजाराची तीव्रता नक्कीच कमी करू शकता.

डायबेटीस या आजाराची तीव्रता कमी करण्यासाठी आपण सकाळी कोरफडाच्या गरापासून बनवलेलं सरबत प्या. कोरफडामध्ये असणाऱ्या अँटिऑक्सिडेंट प्रभावामुळे आपल्या शरीरामधील इन्सुलिन निर्मिती प्रक्रिया सुरळीत काम करण्यास मदत मिळते.

दालचिनीचा आपल्या रोजच्या बिनसाखरेच्या चहामध्ये समावेश केल्याने शरीरातील साखरेची पातळी कमी व्हायला मदत मिळते. तसेच दालचिनीयुक्त चहा प्यायल्याने लठ्ठपणा आणि उच्च रक्तदाब हि कमी होतो.

डायबेटीस या आजाराची तीव्रता कमी करण्यासाठी आपण दिवसभरात दोन वेळा एक चमचा मेथी दाण्यांची पावडर पाण्यामधून किंवा तशीच घ्या. मेथी दाण्यांमध्ये असणाऱ्या पोषक घटकांमुळे आपल्या रक्तामधील साखरेची पातळी नियंत्रित राहायला मदत मिळते.

दुपारच्या बिनसाखरेच्या चहामध्ये थोडेसे आले मिसळून प्या. आल्यामध्ये असणाऱ्या अँटिऑक्सिडेंट घटकांमुळे आपल्या रक्तामधील साखरेची पातळी नियंत्रित व्हायला मदत मिळते.

या वनस्पतींचा वापर करून आपण आपल्या रक्तामधील साखरेची पातळी नियंत्रित करू शकाल त्याच बरोबर आपण काही शारीरिक व्यायाम आणि आहारात हि बदल करणे गरजेचे असते.

त्यामुळे आपल्याला चांगले परिणाम बघायला मिळतील. डायबेटीसचा त्रास असलेल्यांनी दिवसभरात पुरेशे पाणी प्यायला पाहिजे. जास्त पाणी प्यायल्याने रक्तामधील साखरेची पातळी नियंत्रित राहते.

आपल्याला रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी औषधी वनस्पतीचा वापर ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *