- आरोग्य

उकडलेले अंडे खाण्याचे आरोग्यदायी फायदे

उकडलेल्या अंड्यामध्ये प्रथिने, कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी-६, व्हिटॅमिन बी-१२ असे घटक असतात. हे सर्व पोषक घटक आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात. उकडलेली अंडी हा सकाळच्या नाश्त्यासाठी एक चांगला पर्याय होऊ शकतो. चला तर जाणुन घेऊयात उकडलेली अंडी खाण्याचे आरोग्यदायी फायदे.

उकडलेली अंडी खाल्याने हाडे मजबुत होतात रोजच्या श्रमाने आपल्या हाडांची झीज होत असते उकडलेले अंडे खाल्याने ही झीज भरून निघते. उकडलेले अंडे खाल्याने अंड्यामधील घटकामुळे त्वचा तजेलदार होण्यास मदत मिळते.

उकडलेल्या अंड्यामध्ये व्हिटॅमिन ए असते जे केसांना मजबूत करते आणि डोळ्यासाठी चांगले असते. शरीरातील लोहाची (आयरन) कमतरता दूर करण्यासाठी आपण आपल्या आहारात उकडलेल्या अंड्यांचा समावेश करू शकता.

आहारात उकडलेल्या अंड्याचे वापर केल्यास त्यातून भरपूर प्रथिने मिळतात. उकडलेल्या अंड्यातील पिवळया बलकामध्ये व्हिटॅमिन डी असते, जे हाडे मजबूत बनवते तसेच शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते.

उकडलेल्या अंड्यामध्ये ल्यूटीन हा अँटी ऑक्सिडंट घटक  असतो. उकडलेल्या अंड्याचे सेवन केल्याने आपली दृष्टी चांगली राहते. अंड्यांमध्ये असणाऱ्या अँटीऑक्सिडंट्समुळे आपल्या डोळ्यामधील रेटिना मजबूत होतो.

त्यामुळे उकडलेली अंडी खाल्याने मोतीबिंदू होण्याचा धोका काही प्रमाणात कमी होतो. वाढत्या वयातील मुला मुलींना त्यांच्या स्नायू व हाडांची वाढ चांगली होण्या करता उकडलेले अंडे देऊ शकता.

सकाळच्या नाश्त्यामध्ये उकडलेल्या अंड्याचा समावेश केल्याने आपल्याला दिवसभर काम करण्यासाठी उर्जा मिळेल. अंड्यांचे सेवन केल्याने आपले शरीर तंदुरुस्त आणि निरोगी राहील.

महत्वाची सुचना – ज्यांना उच्च रक्तदाब, मधुमेह आणि हृदयरोग आहे त्यांनी अंड्याचा पिवळा भाग खाऊ नये. कारण त्यामध्ये कोलेस्ट्रोलचे  प्रमाण जास्त असते. उकडलेली अंडी खाल्ल्यानंतर मास, मच्छी खाणे शक्यतो टाळावे.

आपल्याला उकडलेले अंडे खाण्याचे आरोग्यदायी फायदे ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा.

जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *