- आरोग्य

मायग्रेनची लक्षणे त्यावरील घरगुती उपाय

आजकाल आपली बदलेली दिनचर्या ज्यामध्ये ना झोपण्याची वेळ असते ना उठण्याची यामुळे डोकेदुखी होणे हि आपल्यासाठी सामान्य गोष्ट झालेली आहे. आज आपण एका वेगळ्या प्रकारच्या डोकेदुखी बद्दल जाणून घेणार आहोत. या डोकेदुखीला मायग्रेन (अर्धशिशी) असे म्हणतात.

मायग्रेन म्हणजे डोक्याच्या एकाबाजूला तीव्र वेदना होणे. मायग्रेनच्या वेदना काही तासांपासून अनेक दिवसांपर्यंत हि राहू शकतात. मायग्रेनचा त्रास होत असल्यास होणाऱ्या वेदनेमुळे आपण मोठ्या प्रमाणात चीड चिडे होत असतो.

मायग्रेनचा त्रास होत असल्यास मळमळ होणे, उलट्या होणे अशी लक्षणे दिसतात.या बरोबरच काही लोकांमध्ये रक्तदाब हि कमी होतो. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत. मायग्रेनचा त्रास कमी करण्यासाठी घरगुती उपाय

सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात मायग्रेन होण्याची काय कारण असतात. काही लोकांना तीव्र वासामुळे मायग्रेनचा त्रास व्हायला सुरुवात होते. तर काही लोकांना मानसीक तणावामुळे, अचानक तीव्र उजेडात गेल्यावर, कोणताही तीव्र आवाज ऐकल्यावर मात्र ह्या आजाराच मुख्य अस कारण वेगवेगळ्या लोकांच्या बाबतीत वेगवेगळी असतात.

मायग्रेनचा त्रास कमी करण्यासाठी आपण पुढील घरगुती उपाय करू शकता. सकाळी झोपेतून उठल्यावर एक ग्लास गार दुधासोबत लहानसा गुळाचा खडा चघळा, यामुळे आपला त्रास कमी व्हायला मदत मिळेल. ज्यांना हा त्रास नेहमी होतो. त्यांनी हा उपाय नियमित केला तरी चालेल. मात्र मधुमेहाचा त्रास असल्यास आपण गुळाचा खडा खाऊ नका.

मायग्रेनचा त्रास कमी करण्यासाठी दालचिनी फार प्रभावी आहे. यासाठी आपण थोड्याशा दालचिनीची पावडर थंड पाण्यात मिसळून पेस्ट बनवून आपल्या कपाळावर आणि ज्या बाजूला जास्त वेदना होत आहे त्या ठिकाणी लावा. आणि साधारणपणे अर्धा तास राहूद्या. नंतर धुऊन टाका. ह्या उपायाने आपल्या वेदना कमी होऊन आपल्याला आराम मिळेल.

मायग्रेनचा त्रास कमी करण्यासाठी आपण दुखणाऱ्या बाजूवर बर्फाने शेकवले तरी सुद्धा आराम मिळू शकतो. यासाठी सुती कपड्यामध्ये किंवा टॉवेलमध्ये थोडेसे बर्फाचे खडे घ्या. चांगले गुंडाळून त्या कपड्याने दुखणारी बाजू पाच मिनिटे शेकवा. आपल्याला आराम वाटेल.

मायग्रेनचा त्रास कमी करण्यासाठी आपण आपल्या नाकामध्ये शुद्ध तुपाचे दोन थेंब टाकू शकता या उपायाने हि आपल्याला आराम मिळू शकतो. मायग्रेनचा त्रास होऊ नये यासाठी आपण आपली झोप पूर्ण घ्या.

शांत ठिकाणी झोपण्याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त पाणी प्या. आपल्या मेंदूला व्यवस्थित कार्य करण्यासाठी पाण्याची गरज असते त्यामुळे आपण पुरेसे पाणी पिणे गरजेच असते.

आपल्याला मायग्रेनचा त्रास कमी करण्यासाठी घरगुती उपाय ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा.

जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा.

इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *