- आरोग्य

पाय मुरगळणे, स्नायू दुखावणे यावर कोणते घरगुती उपाय करता येऊ शकतात?

कधी कधी चालताना, पळताना, जिना चढताना अचानक पाय मुडपतो यालाच पाय मुरगळणे अस म्हणतात. इंग्रजीमध्ये या स्थितीला ट्वीस्ट इन अँकल अस म्हणतात. पाय मुरगळल्यावर स्नायू दुखावल्याने त्याठिकाणी सूज येते, वेदना होत असतात.

जर होणारा त्रास हा कमी प्रमाणात असेल तर काही प्रथमोपचार केल्याने हि आपल्याला आराम मिळू शकतो. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत पाय मुरगळणे, स्नायू दुखावणे यावर घरगुती उपाय.

पाय मुरगळल्यावर वेदना आणि सूज कमी करण्यासाठी आपण हा सोपा उपाय करू शकता यासाठी छोट्या टॉवेलमध्ये बर्फाचे काही तुकडे घ्या. नंतर टॉवेल गुंडाळून आपल्याला पायावर ज्या ठिकाणी सूज आलेली आहे त्या ठिकाणी बर्फाने 5 ते 10 मिनिटे शेकवा. बर्फाने शेकवल्याने आपल्या वेदना कमी होतील.

पाय मुरगळल्यावर वेदना आणि सूज कमी करण्यासाठी आपण हळदीचा हि वापर करू शकता यासाठी दोन चमचे हळद पावडर थोड्याश्या पाण्यात मिसळून पेस्ट बनवा त्यामध्ये आपण थोडेसे मीठ हि टाकू शकता. नंतर हि पेस्ट आपल्या सहन होइल त्या हिशेबाने थोडी गरम करून आपल्या दुखणाऱ्या पायावर लावा. हळदीच्या लेपाने सूज आणि वेदना कमी होतील.

पाय मुरगळल्यावर वेदना आणि सूज कमी करण्यासाठी आपण त्यावर निरगुडीच्या झाडाचा पाला थोडासा गरम करून रात्रभर बांधू शकता. यामुळे सूज आणि वेदना कमी होऊन आपल्याला आराम मिळू शकतो. वरती दिलेल्या प्रथमोपचाराने आपल्याला आराम न मिळाल्यास आपण डॉक्टरांची मदत घ्या.

आपल्याला पाय मुरगळणे, स्नायू दुखावणे यावर घरगुती उपाय ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा.

जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा.

इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *