- आरोग्य

प्रतिकार शक्ती (इम्यूनिटी बूस्ट) मजबूत करण्यासाठी दिनचर्येमध्ये आणि आहारामध्ये करा हे बदल

काही लोक थोडेसे जरी वातावरण बदलले किंवा प्रवास झाला कि आजारी पडतात कमजोर प्रतिकारशक्ती मुळे हे होत असत. प्रतिकार शक्ती कमजोर असल्यावर सर्दी, खोकला, घसादुखी, ताप येणे असे आजार आपल्याला सारखे सारखे होत राहतात.

जर आपण आपल्याला दिनचर्येमध्ये आणि आहारामध्ये काही बदल केला तर आपण आपली प्रतिकार शक्ती मजबूत करू शकतो. चला तर जाणून घेऊयात इम्यूनिटी बूस्ट करण्यासाठी दिनचर्येमध्ये आणि आहारामध्ये कोणकोणते बदल केले पाहिजेत.

सकाळी झोपेतून उठल्यावर एक ग्लास कोमट पाण्यात 2 चमचे लिंबाचा रस किंवा मध मिसळून प्या. सकाळी झोपेतून उठल्यावर आपण दिवसाआड एक कप गुळवेलाचा काढा हि घेऊ शकता.

सकाळच्या नाश्त्यामध्ये केळी, सफरचंद,पेरू, चिकू, डाळिंब, किवी अश्या फळांचा समावेश करा. अथवा संत्री, मोसंबीचा ज्यूस प्या. सकाळच्या नाश्त्यामध्ये दोन उकडलेल्या अंड्यांचा हि समावेश करू शकता.

सकाळच्या नाश्त्यामध्ये आपण काजू, बदाम, अंजीर, मनुके अशा सुक्यामेव्याचा हि समावेश करू शकता. सकाळच्या नाश्त्यामध्ये गुळ शेंगदाणे खाऊ शकता. रोज एकसारखा नाश्ता न होण्यासाठी वेगवेगळे पर्याय सांगितले आहेत.

दुपारच्या जेवणात घरात बनवलेली भाजी भाकरी, चपाती खा. त्यासोबत ठेचा किंवा लसणाची चटणी आपण खा. आणि थोडेसे सलाड खा. पालेभाज्याचा मोड आलेल्या कडधान्यांचा आपल्या आहारात समावेश करा.

दुपारच्या चहा मध्ये थोडीशी दालचिनी, थोडीशी लवंग थोडेसे आले मिसळून प्या. रात्रीचे जेवण हलके असुद्या. झोपण्याआधी एक ग्लास कोमट दुधामध्ये अर्धा चमचा हळद पावडर मिसळून प्या.

वरती दिलेल्या गोष्टी केल्याने आपली रोग प्रतिकार शक्ती मजबूत होईल. या बरोबरच दिवसभरात पुरेसे पाणी प्या. वेळेवर जेवण करा. रात्री पुरेशी झोप घ्या. शारीरिक व्यायाम, श्वासाचे व्यायाम, योगासने अशा गोष्टी जश्या जमतील तसे करा. ताण तणाव घेऊ नका. बाहेरचे तेलकट मसालेदार पदार्थ खाणे टाळा.

आपल्याला इम्यूनिटी बूस्ट करण्यासाठी दिनचर्येमध्ये आणि आहारामध्ये कोणकोणते बदल केले पाहिजेत ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *