- आरोग्य

रात्री भिजायला ठेवलेले मनुके सकाळी रिकाम्या पोटी खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे

मनुके खाणे आपल्या शरीरासाठी फायद्याचे असते. मनुक्यामध्ये  लोह, पोटॅशियम फायबर असे शरीराला उपयोगी घटक असतात. मनुक्याचे सेवन केल्याने शरीराला बरेच फायदे होतात. चला तर जाणून घेऊयात मनुक्याचे सेवन कशा पद्धतीने केल्यावर कोणते फायदे होतात.

रक्तदाबाची समस्या असल्यास रात्री अर्धा ग्लास पाण्यात ८-१० मनुके भिजवा आणि सकाळी उठून रिकाम्या पोटी ते पाणी प्या. इच्छा असल्यास भिजवलेले मनुकेही तुम्ही खावू शकता. यामुळे रक्तदाबाच्या समस्येवर नक्कीच फायदा होईल.

मनुके खाण्यामुळे रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल कमी होते, रक्तदाब नियंत्रित राहतो त्यामुळे हृद्यविकाराची धोका कमी होतो. दररोज सकाळी भिजवलेले मनुके खाल्ल्याने हाडं मजबूत होण्यास मदत होते.

मनुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते. यामुळे दररोज मूठभर मनुके तरी खाल्ले पाहिजेत. सकाळी भिजवलेले मनुके खाल्ल्याने स्मरणशक्ती सुधारण्यास मदत होते.

भिजवलेले मनुके खाल्ल्याने मनुक्यामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्याने मनुके खाण्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढते, रक्त वाढते, रक्तदाब नियंत्रित राहतो. त्याचबरोबर वजन वाढण्यास ही मदत होते.

झोपण्याच्या एक तास आधी उकळून थंड केलेल्या  दुधासोबत मनुक्यांचे  सेवन केल्यास पोटाशी संबंधित आजारांवर मात मिळवता येते. खासकरून बद्धकोष्टावर हा उपाय करून पाहिल्यास नक्कीच फायदा होतो.

यामुळे पचनक्रियाही सुधारते. मनुक्यामध्ये पोटॅशियम मोठ्या प्रमाणात असते. रोज एक चमचा मनुके लसणाच्या पाकळीसोबत खाल्ल्यास रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यास मदत मिळते.

नियमित मनुक्यांचं सेवन केल्यानं हिरड्या आणि दात मजबूत राहतात. मनुक्यांमध्ये असे घटक असतात जे तोंडातील बॅक्टेरियांशी लढतात यामुळे दात किडण्याची समस्या, हिरड्यांचे आजार होत नाहीत.

मनुके खाल्याने पोट साफ होण्यास आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत होईल. मनुकांच्या सेवनाने हृदयाचे आरोग्यही राखले जाते. मनुकांमध्ये बोरॉन नावाचा घटक असतो, जो सांधेदुखीच्या त्रासापासून मुक्ती देण्यासाठी उपयुक्त ठरतो

डोळ्यांच्या आरोग्यासाठी बीटा कॅरोटीन फायद्याचे ठरते. मनुक्यामध्ये बीटा कॅरोटीन मोठ्या प्रमाणत असते. त्यामुळे नजर सुधारण्यासाठी डोळ्यांच्या आरोग्यासाठी मनुक्याचे सेवन करावे.

आपल्याला भिजवलेले मनुके सकाळी रिकाम्या पोटी खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे  ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *