- आरोग्य

पाचनशक्ती मजबूत करण्यासाठी घरगुती उपाय

बराच वेळ एकाच जागी बसून काम करण्यामुळे, शारीरिक हालचालीचा अभाव, आपल्या आहारामध्ये पुरेश्या फायबर घटकांचा अभाव, तळलेले पदार्थ, रासायनिक द्रव्ये मिसळलेले पचायला जड असणारे पदार्थ खाण्यामुळे, पुरेशे पाणी न पिण्याची सवय, रात्री व्यवस्थित झोप न घेण्याची सवय या अशा गोष्टींमुळे आपण खाल्लेल्या अन्नाचे पचन व्यवस्थित होत नाही.

मग आपल्याला एसिडीटी, करपट ढेकर येतात, पोटात गॅस होतो, पोट फुगल्यासारख वाटणे, पोट व्यवस्थित साफ होत नाही, अशा वेगवेगळ्या समस्या सुरु होतात. ह्या समस्या होऊ नये यासाठीच आपण आज आपण सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत पाचनशक्ती मजबूत करण्यासाठी घरगुती उपाय.

आपली पाचनशक्ती मजबूत करण्यासाठी आपण हा सोपा उपाय घरच्या घरी करू शकता यासाठी एका छोट्या कपामध्ये एक चमचा लिंबाचा रस घ्या त्यामध्ये अर्धा चमचा सैंधव मीठ मिसळा त्यानंतर छोटासा आल्याचा तुकडा ठेचून त्याचा रस अर्धा चमचा या मिश्रणात मिसळा.

तयार झालेलं मिश्रण जेवण करण्यापूर्वी अर्धा तास आधी प्या. आठ दिवस हा उपाय केल्याने आपल्याला होत असलेली अन्न न पचण्याची समस्या पूर्णपणे संपून जाईल.

या मिश्रणामध्ये असणारे सैंधव मीठ आपली चयापचय क्षमता वाढवण्यास मदत करते त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये पीएच पातळी नियंत्रित ठेवण्याचे कार्य करते. आपल्या शरीरातील पीएच पातळी नियंत्रित झाल्याने शरीरातील सर्व कार्ये सुरळीत चालण्यास मदत मिळते.

यामिश्रणामध्ये असणारे आले पाचक असते. आल्याचा रसाने आपल्या होत असलेली मळमळ एसिडीटी थांबेल. अन्न पचन व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे होईल.

या मिश्रणामध्ये असणाऱ्या लिंबू रसामुळे लिंबामध्ये असणाऱ्या व्हिटामिन सीमुळे आपली रोग प्रतिकार शक्ती चांगली व्हायला मदत होईल. तसेच अन्न पचन सुलभ रित्या व्हायला मदत मिळेल.

आपल्याला पाचनशक्ती मजबूत करण्यासाठी घरगुती उपाय ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा.

जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा.

इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *