- आरोग्य

मौल्यवान आहे आहे ह्या झाडाची फळे, फक्त पावसाळ्यात उगवते, जाणून घेऊयात याचे फायदे

आपण स्वस्थ, निरोगी राहाव यासाठी आम्ही आपल्याला नेहमीच वेगवेगळ्या औषधी वनस्पतींबद्दल त्यापासून मिळणाऱ्या फायद्यांबद्दल सांगत असतो.  आम्ही आज हि आपल्यासाठी अशाच एका औषधी वनस्पती बद्दल माहिती घेऊन आलो आहोत. आपण आमच्या फेसबुक पेजला अजून लाईक केले नसेल तर लाईक करा जेणेकरून आम्ही दररोज देत असलेली माहिती आपल्याला वाचायला मिळेल.

आज आपण ज्या औषधी वनस्पती बद्दल जाणून घेणार आहोत ती खूप विशेष आहे. आपल्याला मूळव्याधाचा त्रास असल्यास ह्या वनस्पतीच्या पानापासून बनवलेला काढा घेतल्याने आराम मिळतो.

वजन कमी करायचे असल्यास हि ह्या वनस्पतीचा उपयोग होतो. पाचनतंत्र चांगले राहण्यासाठी हि ह्या वनस्पतीचा उपयोग होतो. जर आपल्या शरीरावर कोठेही सूज आली असेल तर ती सूज कमी करण्यासाठी सुद्धा ह्या वनस्पतीचा उपयोग होतो.

ह्या वनस्पतीचे नाव रसभरी असे आहे. इंग्रजीमध्ये याला केप गूजबेरी अस म्हणतात. आपल्या देशात आपण हि  फळ आकाराने लहान असल्यामुळे तितकी प्रचलित नाही आहेत.

परंतु बऱ्याचश्या देशांमध्ये ह्या वनस्पतीचा वापर मोठ्या प्रमाणात केला. आपल्या भागात ह्या वनस्पतीला काय म्हणतात हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जेणेकरून ज्यांना हि वनस्पती माहित नाही त्यांना हि या बहुमोल वनस्पती बद्दल माहिती मिळू शकेल.

जर आपण हि वनस्पती ओळखली असेल तर चांगलच आहे. हि वनस्पती सगळीकडेच आढळणारी आहे. अगदी शेताच्या बांधावर, शेतामध्ये, नदीकाठी, पाणवठयावर हि वनस्पती आपण बघितली असेल. इतकेच काय लहानपणी ह्या वनस्पतीची पिकलेली आंबट गोड फळ हि खाल्ली असतील! ह्या वनस्पतीची फळे चवदार आणि पोष्टिक असतात.

रसभरीच्या पानामध्ये फॉस्फरस, आयरन, व्हिटामिन ए, व्हिटामिन सी, कॅल्शियम असे घटक असतात. रसभरी या वनस्पतीच्या फळांमध्ये कॅलरीज खूप कमी असतात. यामध्ये अँटि ऑक्सिडंट्स, कॅरोटीनोइड्स,पॉलीफेनॉल, व्हिटॅमिन सी असे पोषक घटक असतात.

रसभरीच्या फळांचे सेवन केल्याने त्यामध्ये असणाऱ्या व्हिटामिन सीमुळे आपली रोग प्रतिकार शक्ती सुधारायला मदत मिळते. रसभरीच्या पानाचा रस काढून त्यामध्ये थोडेसे पाणी मिसळून प्यायल्याने अनेक आजारांपासून आपले संरक्षण होते.

रसभरीच्या फळांमध्ये पॉलीफेनॉल, कॅरोटीनोईड्स हे फायटो-केमिकल्स असतात, रसभरीच्या फळांचे सेवन केल्याने आपल्याला उच्च रक्तदाब पातळी नियंत्रित करण्यास मदत होईल. याबरोबर रसभरीच्या फळांमध्ये असलेले विद्रव्य पेक्टिन फायबर खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी करून आपले हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते.

रसभरीच्या फळांचे सेवन केल्याने डोळ्यांचे आरोग्य आणि दृष्टी सुधारण्यास मदत होते. त्याचबरोबर ह्या फळांचे नियमित सेवन केल्याने आपण मोतीबिंदू सारखा आजार टाळू शकता.

रसभरीच्या फळांमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस हे घटक असतात. या फळांचे सेवन केल्याने आपली हाडे आणि दात मजबूत होतात. रसभरीच्या फळांचे सेवन केल्याने त्यामध्ये असणाऱ्या अँटीऑक्सिडंट्स घटकांमुळे आपण सर्दी, फ्लू अशा आजारांपासून स्वताला वाचवू शकता.

आपल्याला ह्या वनस्पती बद्दलची माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. आपल्या भागात ह्या वनस्पतीला कोणत्या नावाने ओळखतात हे कमेंट मध्ये नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *