- आरोग्य

साइनस आजार होण्याची कारणे, लक्षणे आणि घरगुती उपाय

वातावरणात गारवा आल्यावर बऱ्याच लोकांचे सर्दीने नाक बंद होते, अर्ध किंवा पूर्ण डोक दुखायला लागत, नाकामधून जास्त प्रमाणात पाणी गळायला लागत, काही जणांना सर्दीमुळे ताप हि येतो, डोळ्यांच्या पापण्यांच्या बाजूने दुखायला लागत, चेहरा सुजल्यासारखा दिसू लागतो.

कोणत्याही गोष्टीचा वास येत नसल्यास, डोळ्यांच्या वरच्या भागात वेदना होत असल्यास, खोकला येत असल्यास, नाकात आणि गळ्यात जास्त प्रमाणात कफ जमा झाल्यासारखे वाटते अशी लक्षणे ह्या साइनस आजाराची असतात.

साइनस हा आजार झाल्यास धूळ, धूर सहन होत नाही. वाढत्या प्रदूषणामुळे, एखाद्या वासाची एलर्जी असेल आणि नेमका तोच वास बराच वेळ येत असल्यावर, नाकामध्ये असणाऱ्या हाडाची वाढ झाली असल्यास, श्वास घ्यायला अडचण येते. म्हणूनच वेळीच ह्या आजारावर उपचार करणे गरजेचे असते. साइनसचा त्रास कमी होण्यासाठी आपण हे काही प्रथमोपचार करू शकता.

साइनसचा त्रास कमी होण्यासाठी आपण सकाळी पालेभाज्या आणि गाजर, बीट, लसून, टोमेटो अश्या भाज्यांचे गरम सूप घ्या यामुळे आपले नाक व्हायला मदत होईल तसेच रोग यामध्ये असणाऱ्या पोषक घटकांमुळे रोग प्रतिकार शक्ती चांगली होईल.

साइनसचा त्रास कमी करण्यासाठी आपण बिना दुधाचा आले घालून चहा दिवसातून दोन ते तीन वेळा प्या. आल्यामध्ये असणाऱ्या अॅन्टी ऑक्सिडंट तत्वांमुळे आपली सर्दी कमी येऊन आपल्याला आराम मिळेल.

साइनसचा त्रास कमी करण्यासाठी दिवसातून तीन ते चार वेळा गरम पाण्याची वाफ घ्या. वाफ घेताना दीर्घ श्वास घेण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून आपले नाक लवकर मोकळे होऊन आपल्याला आराम मिळेल. साइनसचा त्रास होत असल्यावर थंड गोष्टी खाणे पूर्णपणे थांबवा. अंघोळ करण्यासाठी सुद्धा गरम पाण्याचाच वापर करा. कोमट पाणी प्या.

आपल्याला साइनसचा त्रास कमी होण्यासाठी प्रथमोपचार ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *