- आरोग्य

कोलेस्टेरॉलची पातळी कमी ठेवण्यासाठी प्रभावी टिप्स

शरीरामधील कोलेस्टेरॉलची पातळी वाढली कि हृदयविकाराचा धोका असतो हे आपल्याला माहित असेलच! कोलेस्टेरॉल हे एक प्रकारचे फॅट असत जे लिवरमध्ये तयार केल जात. आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशीचे आवरण कोलेस्टेरॉलपासून तयार केलेल असत.

आपल्या शरीरात अनेक हार्मोन्स कोलेस्टेरॉलपासून तयार केले जातात. कोलेस्टेरॉल सूर्यप्रकाशाचे व्हिटॅमिन डी मध्ये रूपांतर करण्यास मदत करते. शरीरातील विषारी पदार्थ शोषून आपल्याला निरोगी ठेवण्याचे कार्य करते.

कोलेस्टेरॉल हे आपल्या मेंदूसाठी देखील फायदेशीर असत. खरतर कोलेस्टेरॉल शरीराला आवश्यक असा नैसर्गिक घटक आहे. मात्र कोलेस्टेरॉल शरीरात विरघळत नाही.

जास्त प्रमाणात कोलेस्ट्रोलयुक्त आहार घेतला तर कोलेस्ट्रोलची पातळी वाढून ते आपल्या शरीरातील रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊ लागते ज्यामुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात. या शिवाय वाढलेल्या कोलेस्ट्रोलमुळे हृ’द’य’वि’का’रा’चा झटका, स्ट्रोक येण्याचा धोका निर्माण होतो. तसेच किडनीचे आजार, थायरॉइड असे आजार होण्याचा धोका असतो.

अति प्रमाणात कोणतीही गोष्ट असणे आपल्या आरोग्यासाठी हितकारक नसते. आपल्या शरीरात एकूण कोलेस्टेरॉलची पातळी 200 mg/dl पेक्षा कमी असेल तर ते आपल्या आरोग्यासाठी चांगले असते.

यामध्ये एलडीएल कोलेस्टेरॉल 100 मिग्रॅ/dl पेक्षा कमी आणि एचडीएल 60 मिग्रॅ/ dl पेक्षा जास्त आणि ट्रायग्लिसराइड 150 मिग्रॅ/dl पेक्षा कमी असणे आपल्या आरोग्यासाठी चांगले असते. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत कोलेस्टेरॉलची पातळी कमी ठेवण्यासाठी प्रभावी घरगुती उपाय

कोलेस्ट्रोल कमी करण्यासाठी सर्वप्रथम आपल्या आहारातून तेलकट, मैदायुक्त पदार्थ, मिठाई, अति गोड पदार्थ, हवाबंद डब्यातील पदार्थ खाणे थांबवावं लागेल या सोबतच आपण जर नियमित मांसाहार करत असाल तर त्याचे प्रमाण हि कमी करावे लागेल. म’द्यपान, धुम्र’पान बंद कराव लागेल.

कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी नियमितपणे सकाळी एक ग्लास गरम पाणी प्या. गरम पाण्यामध्ये चमचाभर मध किंवा लिंबाचा रस मिसळून प्यायल्याने आपल्याला लवकर फरक दिसून येईल.

दोन चमचे भिजवलेले मेथीदाणे खाल्याने हि कोलेस्ट्रोल कमी व्हायला मदत मिळते. कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी आहारामध्ये मोड आलेले कडधान्य, हिरव्या पालेभाज्या यांचा समावेश करावा लागेल. आहारात सुकामेवा म्हणजेच अक्रोड, बदाम अशा रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करणाऱ्या गोष्टींचा समावेश करावा लागेल.

कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी नियमित सहा ते आठ तास झोप घ्यावी लागेल. जेणेकरून अन्नाचे पचन व्यवस्थित होईल. दिवसभरात 3 ते 4 लिटर पाणी प्यावे लागेल.

कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी नियमितपणे सकाळी आणि संध्याकाळी सायकलिंग, धावणे, चालणे, शारीरिक कसरतीचा व्यायाम करणे गरजेचे असते. नियमित मेडिटेशन करा त्यामुळे तणाव कमी होईल. दिवसभर प्रसन्न वाटेल.

आपल्याला कोलेस्टेरॉलची पातळी कमी ठेवण्यासाठी प्रभावी टिप्स ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *