- आरोग्य

व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता दूर करण्यासाठी घरगुती उपाय

आपण निरोगी आणि स्वस्थ राहाव अस आम्हाला वाटत म्हणूनच आही नेहमी आपल्या चांगल्या आरोग्यासाठी महत्वाची माहिती देत असतो. आज आपण शरीरासाठी एका महत्वाच्या जीवनसत्वाबद्दल जाणून घेणार आहोत. आपल्याला हि माहिती कशी वाटते ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा.

व्हिटॅमिन बी 12 एक आवश्यक पोषक तत्व आहे त्याच्या कमतरतेमुळे शरीरात बऱ्याच प्रकारचे आजार उद्भवू शकतात. व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता आपल्याला केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक आजार देखील बनवू शकते.

व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे शरीरातील रक्ताची कमतरता, पाचन तंत्राचा त्रास आणि अशक्तपणा होऊ शकतो. थोडेसे काम केले तरी हि थकवा येणे, गोष्टी लक्षात न राहणे, हातापायांना मुंग्या येणे, भूक कमी होणे.

त्वचेचा रंग फिकट पडणे, त्वचा पिवळसर दिसणे, नजर कमजोर झाल्यासारखे वाटणे, सारखे सारखे तोंड येणे, आणि बद्धकोष्ठता अशा समस्या उद्भवू शकतात. म्हणून, व्हिटॅमिन बी 12 शरीराच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे.

आपले शरीर व्हिटॅमिन बी 12 स्वतः बनवत नाही. म्हणून आपल्या आहारात भरपूर व्हिटॅमिन बी 12 घेणे आवश्यक आहे. व्हिटॅमिन बी 12 आपल्या मज्जासंस्थेचे रक्षण करते आणि लाल रक्तपेशी विभाजित करून शरीरात उर्जा प्रदान करण्याचे कार्य करते.

म्हणून, आज आम्ही आपल्याला शरीरात व्हिटॅमिन बी 12 वाढवण्यासाठी आपण कोणते घरगुती उपाय करू शकतो याची माहिती देणार आहोत. आपल्या रोजच्या आहारात या गोष्टींचा समावेश करु शकता.

व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेची पूर्तता करण्यासाठी आपल्याला आहारात दुधाचा समावेश केला पाहिजे. एका ग्लास दुधात शरीराला आवश्यक प्रमाणात व्हिटॅमिन बी 12 मिळेल. याबरोबर दुधापासून बनवण्यात येणारे दही, ताक, लोणी, पनीर या मधून ही आपल्याला  व्हिटॅमिन बी 12 मिळू शकते.

आपल्या सोयीनुसार आपण या गोष्टींचा वापर आपल्या आहारात करावा. आपल्या आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा. हिरव्या पालेभाज्यांमध्ये ही व्हिटॅमिन बी 12 असते.

व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता दूर करण्यासाठी आपल्या आहारात तीळाचा समावेश करा. तीळामधून आपल्याला व्हिटॅमिन बी 12 मिळू शकेल. व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता दूर करण्यासाठी आहारात लिंबू वर्गीय फळांचा समावेश करा.

आठवड्यातून 3-4 केळी खाल्ल्या तर आपल्याला व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे त्रास होत असेल तर तो दूर होण्यास मदत मिळेल. व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता भागवायची असेल तर आपण आपल्या रोजच्या आहारात गाजर, बीट, मुळा अशा भूमीज भाज्यांचा समावेश आपल्याला आहारात करावा लागेल.

व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता दूर करण्यासाठी आहारात सुकामेवा म्हणजेच बादाम, काजू , अंजीर , शेंगदाणे यांचा समावेश करा. व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता भागवायची असेल तर आपण आपल्या रोजच्या आहारात मशरूमचा समावेश करू शकता.

या बरोबरच आपण मांसाहार करत असल्यास अंडी, मटन, मासे खाल्याने सुद्धा आपल्याला व्हिटॅमिन बी 12 मिळू शकते. व्हिटॅमिन बी 12 हे आपल्या निरोगी जगण्यासाठी एक महत्त्वाचा पोषक घटक आहे.

व्हिटॅमिन बी 12 हे काही शाकाहारी पदार्थांमध्ये सुद्धा आढळत जसे कि दुग्धजन्य पदार्थ इ. व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता टाळण्यासाठी जेव्हा आपल्याला शक्य असेल तेव्हा या गोष्टींचा आपल्या आहारात समावेश अवश्य करा.

आपल्याला व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता दूर करण्यासाठी घरगुती उपाय ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा.

जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा.

इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *