- आरोग्य

पावसाळ्यात होणाऱ्या फंगल इन्फेक्शनवर घरगुती उपाय

पावसाळ्यात फंगल इन्फेक्शनचा धो’का सगळ्यात जास्त असतो. आपण पूर्ण काळजी घेतली तरी सुद्धा पावसाच्या दूषित पाण्यासोबत, चिखलासोबत आपल्या हातांच्या आणि पायाच्या बोटांचा संपर्क हा येतोच.

संपर्क आल्यामुळे बोटांच्या मध्ये फंगल इन्फेक्शन व्हायला सुरुवात होते. सगळ्यात आधी आपल्या हाताना आणि पायांना खाज सुटते नंतर एका जागी जास्त वेळा खाजवल्यामुळे त्या जागी जखम होण्यास सुरवात होते.

ही गोष्ट लहान वाटत असली तरीही आपण याकडे दुर्लक्ष केले तर आपल्याला मोठ्या त्रासाला सामोरे जाव लागू शकत म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत. पावसाळ्यात होणाऱ्या फंगल इन्फेक्शनवर घरगुती उपाय.

शरीराला फंगल इन्फेक्शनच्या विरुध्द लढण्यासाठी मजबूत बनणाऱ्या काही औषधी वनस्पती बद्दल जाणून घेऊयात. पावसाळ्यात आपल्याला फंगल इन्फेक्शन होऊ नये यासाठी आपण रात्री झोपायच्या आधी किंवा बाहेर जाताना हाताच्या आणि पायाच्या बोटांना कडुलिंबाचे तेल लावू शकता.

कडुलिंबाचे तेल लावल्याने आपल्या हाताना आणि पायांना फंगल इन्फेक्शन पासून संरक्षण मिळेल. हा उपाय आपण फंगल इन्फेक्शन झाल्यावर केल्यास जखम लवकर भरून येईल. तसेच हाताला किंवा पायाला खाज येत असेल तर ती सुद्धा कमी होईल.

पावसाळ्यात फंगल इन्फेक्शन होऊ नये यासाठी आपण पुढील काळजी घेऊ शकता. एकमेकांचे कपडे, टॉवेल, साबण वापरू नका. अंगात बसायला घट्ट असणारे कपडे वापरू नका. ओले कपडे, पायात भिजलेल्या चपला, शूज घालू नका. आपल्या घरातील कोणाला फंगल इन्फेक्शन झाले असेल तर त्यावर लवकरात लवकर इलाज करा. कारण फंगल इन्फेक्शन हे संसर्गजन्य असते.

आपल्याला पावसाळ्यात होणाऱ्या फंगल इन्फेक्शनवर घरगुती उपाय ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *