- आरोग्य

चेहऱ्यावरील मोठ्या रोम छिद्राना (ओपन पोर्स) कमी करण्यासाठी घरगुती उपाय

आपल्या त्वचेवर लहान लहान छिद्रे असतात. जे त्वचेला श्वास घेण्यासाठी असतात. या छिद्रामधून घाम आणि तेल बाहेर येत असत. मात्र ज्यांची त्वचा तेलकट असते त्यांच्या त्वचेवरील तेलकट पणा राहिल्यामुळे पिंपल्स जास्त प्रमाणात येतात.

घामामधून आपल्या शरीरातील खराब घटक बाहेर पडत असतात. मात्र जास्त प्रमाणात घाम आल्याने आणि शरीरातून तेलकट  घटक बाहेर आल्याने त्वचेवर असणाऱ्या या छिद्रांचा आकार मोठा होतो.

यामुळे आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य कमी होते. आज आम्ही अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्याच्या मदतीने आपण चेहऱ्यावरील मोठ्या रोम छिद्राना कमी करू शकाल. चेहऱ्यावरील मोठ्या रोम छिद्राना कमी करण्यासाठी आपण त्यावर कोरफड गर लावू शकता. यासाठी एका वाटीत अंदाजे 2 चमचे कोरफड गर घ्या.

हलक्या हाताने ते आपल्या त्वचेवर लावा. आपल्या हातानी गोलाकार हालचालीमध्ये चेहऱ्यावर मसाज करा. 10 मिनिटांनी चेहरा धुऊन टाका. हा उपाय नियमित केल्याने आपल्या चेहऱ्यावरील सर्व तेल आणि घाण छिद्रांमधून काढून टाकली जाईल. आणि चेहऱ्यावरील रोम छिद्रे कमी होतील.

चेहऱ्यावरील मोठ्या रोम छिद्राना कमी करण्यासाठी आपण काकडीच्या रसाचा हि वापर करू शकता. यासाठी सर्वप्रथम एका वाटीत थोडासा काकडीचा रस घ्या. त्यामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस मिसळा. (जर आपली त्वचा अति संवेदनशील असेल तर लिंबाचा रस वापरू नका)

हे मिश्रण हलक्या हाताने आपल्या त्वचेवर चोळा 15 मिनिटे राहूद्या नंतर कोमट पाण्याने धुऊन टाका. हा उपाय नियमित केल्याने आपल्या चेहऱ्यावरील रोम छिद्रे मोकळी होऊन आपला चेहरा परत पहिल्या सारखा सुंदर दिसू लागेल.

आपल्याला चेहऱ्यावरील मोठ्या रोम छिद्राना( ओपन पोर्स) कमी करण्यासाठी घरगुती उपाय ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *