- आरोग्य

युरीक एसिडचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी घरगुती उपाय

आपल्या शरीरामध्ये प्युरीन या घटकामुळे युरीक एसिड तयार होत असते. याबरोबरच प्युरीनयुक्त घटक असणाऱ्या पदार्थांचे सेवन आपण जास्त प्रमाणात करत असाल तर त्यामुळे सुद्धा आपल्या शरीरामध्ये युरीक एसिडचे प्रमाण वाढते.

युरीक युरीक एसिडचे प्रमाण वाढल्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या समस्या उदभवू शकतात जसे कि हातापायाच्या बोटांमध्ये वेदना होऊन ती वाकडी तिकडी होऊ शकतात, सांधेदुखी (गाउटचा) त्रास होऊ शकतो, वारंवार ल’घ’वीला लागते, ल’घ’वी करताना जळजळ होऊ शकते.

लघ’वीमध्ये रक्त येऊ शकत, कि’डनी निकामी होण्याचा धोका असतो. म्हणूनच आपण आपल्या शरीरातील युरीक युरीक एसिडचे प्रमाण नियंत्रणात ठेवणे गरजेचे असते. यासाठी आज आपण जाणून घेणार आहोत युरीक एसिडचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी घरगुती उपाय.

युरीक एसिडचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी जास्तीत जास्त पाणी पिण्याची सवय स्वताला लावा. दिवसाला 3 ते चार लिटर पाणी आपण प्यायले पाहिजे. असे केल्याने अतिरिक्त युरीक एसिड लघ’वीवाटे बाहेर निघून जाईल.

युरीक एसिडचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी आपल्या आहारात फायबरयुक्त घटक असणाऱ्या पदार्थांचे सेवन करण्यास सुरुवात करा. जसे कि हिरव्या पालेभाज्या, हंगामी फळ, सलाड, संत्री, लिंबू, मोसंबी अशा फळांचा हि आपण आपल्या आहारात समावेश करा.

युरीक एसिडचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी आपण आपले वजन नियंत्रणात ठेवणे गरजेचे असते. युरीक एसिडचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी आपण सकाळी रिकाम्या पोटी अर्धा चमचा ओवा बारीक करून एक ग्लास पाण्यासोबत प्या.

नियमित ओव्याचे पाणी प्यायल्याने शरीरातील युरीक एसिडचे प्रमाण कमी व्हायला मदत मिळेल. (ओवा हा उष्ण गुणधर्मी असतो त्यामुळे त्याचे अति सेवन करू नका)

युरीक एसिडचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी रिकाम्या पोटी आवळ्याचा रस हि पिऊ शकता. आवळ्यामध्ये व्हिटामिन सी जास्त प्रमाणात असते. ज्यामुळे युरीक एसिडचे प्रमाण संतुलित करण्यासाठी मदत मिळते.

युरीक एसिडचे प्रमाण संतुलित करण्यासाठी आपण सकाळी लिंबू पाणी पिऊ शकता. युरीक एसिडचे प्रमाण संतुलित करण्यासाठी आपण महिन्यातील आठ दिवस गुळवेलाचा काढा हि घेऊ शकता.

नियमित शारीरिक परिश्रमाचे व्यायाम, योगासने करा. दिवसातून अर्धा तास तरी चालण्याचा व्यायाम करा. मानसीक तणाव कमी करण्यासाठी मेडीटेशन करा. वजन नियंत्रणात ठेवा. युरीक एसिडचे प्रमाण संतुलित करण्यासाठी या गोष्टी खाणे टाळा

युरीक एसिडचे प्रमाण वाढवणाऱ्या म्हणजेच ज्यामध्ये ज्यामध्ये जास्त प्रमाणात प्रथिने असतात अशा गोष्टी खाणे टाळा. जसे कि दही, डाळी, मासे, मटन, अति गोड पदार्थ, तळलेले पदार्थ, मसालेदार पदार्थ, कोल्डड्रिंक्स अशा गोष्टी खाणे टाळा. अतिरिक औषधे घेण टाळा.

आपल्याला युरीक एसिडचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी घरगुती उपाय ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *