- आरोग्य

खोकला, सर्दी, घसा खवखवणे आणि कफ यासाठी घरच्या घरी बनवा या औषधी पानांचा काढा

पूर्वी आपल्या घराच्या आजूबाजूला अनेक औषधी वनस्पती असायच्या या औषधी वनस्पतींच्या मदतीने वेगवेगळे आजार बरे व्हायचे. आपल्या पूर्वजांना त्या वनस्पतींचे औषधी गुणधर्म माहित होते.

मात्र आजकाल आपल्याला बऱ्याचश्या औषधी वनस्पतींबद्दल माहित नसत.  म्हणूनच आपण निरोगी आणि स्वस्थ असाव यासाठी आम्ही नेहमी वेगवेगळ्या औषधी वनस्पती वनस्पतींबद्दल माहिती घेऊन येत असतो.

आज हि आम्ही अश्याच एका औषधी वनस्पती बद्दल माहिती घेऊन आलो आहोत. जर आपण या फेसबुक पेजवर नवीन असाल तर पेज लाईक करून ठेवा म्हणजे अशीच चांगली माहिती आपल्यापर्यंत नेहमी पोहचत राहील.

जर तुम्ही फोटोमध्ये दिसणारी औषधी वनस्पती ओळखली असेल तर तिचे नाव कमेंट करा. म्हणजे ज्यांनी ती औषधी वनस्पती ओळखली नसेल त्यांना हि ती कोणती आहे ते समजायला सोप जाईल.

हि वनस्पती आपल्या घराच्या आजूबाजूला, पाणवठ्यावर दिसली असेल परंतु तिचे असणारे औषधी गुणधर्म आपल्याला माहित नसल्याने आपण ती काढून हि टाकली टाकली असू शकते.

आपण आज ज्या औषधी वनस्पती बद्दल जाणून घेणार आहोत  वनस्पतीचे नाव आहे अडुळसा; जर आपल्याला खोकला येत असेल, घसा दुखत असेल आणि घशात खवखव होत असेल तर या वनस्पतीच्या काढ्याने आपल्याला आराम मिळतो.

काढा बनवण्यासाठी ह्या वनस्पतीची चार ते पाच मोठी पाने घ्या ती हातानेच तोडून घ्या. त्यानंतर दीड ग्लास पाणी एका पातेल्यात घ्या. ते पातेले गॅसवर ठेवून चांगली उकळी आल्यानंतर त्यामध्ये हि पाने टाका.

त्यानंतर त्यामध्ये थोडेसे आले किसून टाका त्याचबरोबर दोन लवंगा आणि दोन काळ्या मिऱ्या त्यामध्ये टाका त्यानंतर त्यामध्ये थोडासा गुळ टाकून चांगले 5 ते 7 मिनिटे उकळूद्या नंतर गार होण्यासाठी खाली काढून ठेवा.

जरा कोमट असतानाच हा काढा अर्धा कप ह्या प्रमाणात दिवसातून दोन ते तीन वेळा घेतल्यास आपला घसा मोकळा होईल. तसेच आपल्याला येणारा खोकला सुद्धा कमी होईल. डोकेदुखी थांबेल. (हा काढा उष्ण गुणधर्म असणाऱ्या जिन्नसीपासून तयार करण्यात आला असल्याने कमी प्रमाणातच याचे सेवन करणे आपल्यासाठी हितकारक आहे.)

अडूळश्याच्या पानाचे इतर काही औषधी गुणधर्म आपण समजून घेऊयात जर आपले तोंड आले असेल तर अडूळश्याची पान चावून चघळ्याने आपल्याला आराम मिळू शकतो.

आपले दात किंवा हिरडी दुखत असेल तर आपण दुखणाऱ्या भागावर अडूळश्याच्या पानाचा रस लावला तर वेदना कमी व्हायला मदत मिळते. सांधेदुखीचा त्रास कमी करण्यासाठी सकाळी एक अडूळश्याचे पान सकाळी नियमित खा. आपल्याला फरक जाणवेल.

आपल्याला अडूळश्याच्या पानांचे आरोग्यदायी फायदे ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *