- आरोग्य

चेहऱ्यावरील मुरुमाचे काळे डाग घालवण्यासाठी घरगुती उपाय

दूषित हवामानामुळे त्याचा परिणाम आपल्या नाजूक त्वचेवर होत असतो आणि आपल्याला मुरूम, पुरळ येत राहतात. काहींना हे पुरळ फोडण्याची सवय असते. हे पूरळ फोडल्यानंतर त्या ठिकाणी काळे डाग दिसू लागतात.

बराच काळ हे डाग तसेच राहतात. त्यामुळे आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य कमी होते. तेलकट पदार्थ, बाहेरील फास्ट फूड खाल्ल्यानंतर त्याचा परीणाम आपला चेहऱ्यावर होतो.

पाण्याच्या कमतरतेमुळे या आपल्या चेहऱ्यावर बऱ्याच वेळा पुरळ येतात आणि ते फोडल्यानंतर त्याचे काळे डाग तसेच राहतात. हे काळे डाग घालवण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत. त्यांची आज आपण माहिती घेणार आहोत.

चेहऱ्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे, कारण चेहऱ्याची त्वचा ही अत्यंत नाजूक असते. त्यामुळे कोठेही बाहेर जात असताना तुम्ही एलोवेरा जेल लावल्याने चेहऱ्यासाठी फायदेशीर असते. चेहऱ्यावर काळे डाग पडले असतील तर त्यावर तुम्ही एलोवेरा जेल लावू शकता. त्यामुळे हे काळे डाग निघण्यास मदत होईल.

मुरुमाचे काळे डाग घालवण्यासाठी आपण त्यावर मुलतानी माती हि लावू शकता यासाठी एका वाटीत दोन चमचे मुलतानी माती घ्या त्यामध्ये थोडेसे गुलाबजल मिसळा हलक्या हाताने ते आपल्या चेहऱ्यावर लावा. अर्धा तास राहूद्या नंतर कोमट पाण्याने चेहरा धुऊन टाका. असे केल्याने आपल्या चेहऱ्यावर ग्लो येतो. डाग कमी होतात.

हळद हा चेहऱ्यावरील कोणत्याही समस्येवर एक चांगला उपाय आहे. परंतु ही हळद विकतची न वापरता घरगुती पद्धतीने तयार केलेली हळद हि आपल्या चेहऱ्यासाठी गुणकारी असते. कच्चे दूध हळदीमध्ये मिक्स करून त्याचा लेप तुम्ही लावू शकता. त्यानेही काळे डाग कमी होतील.

पुरळ उठून काळे डाग आले असतील तर त्यावरील सर्वात सोपा  उपाय म्हणजे चंदन. चंदन हे गुलाब पाण्यामध्ये मिक्स करून त्याचा लेप काही काळ चेहऱ्यावर लावून ठेवा आणि काही वेळानंतर तो धुवा. त्यामुळे लवकर फरक जाणवेल आणि तुमचा चेहरा उजळून निघेल.

तांदळाचे पीठ या समस्येवरील एक चांगला उपाय आहे. तांदळाच्या पिठाचा लेप तुम्ही काळे डाग आल्यानंतर लावू शकता. त्यामुळे तुमचा चेहरा उजळेल आणि काळे डाग निघून जातील.

चेहऱ्यावर पुरळ उठल्यानंतर सर्वात महत्त्वाची काळजी म्हणजे तुम्ही हे पुरळ हाताने अथवा नखाने फोडू नका. तसे फोडले असता तुमचा चेहऱ्यावर सर्वत्र पुरळ मोठ्या प्रमाणात वाढेल आणि काळे डागही मोठ्या प्रमाणात येतील. त्यामुळे पुरळ फोडू नका.

आपल्याला मुरुमाचे काळे डाग घालवण्यासाठी घरगुती उपाय ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *