- आरोग्य

केस गळणे थांबवण्यासाठी घरगुती उपाय

स्त्री असो कि पुरुष, तरुण असो किंवा वृद्ध, प्रत्येकजण प्रदूषण, तणाव किंवा बदललेल्या जीवनशैलीमुळे केस गळण्याच्या समस्येने त्रस्त असल्याचे आपण पाहत आहोत. केस गळण्याचे एक कारण हे आपण पूर्वीच्या लोकांसारखा पोषक आणि सात्विक आहार न घेणे हे सुद्धा आहे.

याचबरोबर क्षारयुक्त पाण्याने केस धुतल्याने केस कोरडे आणि निर्जीव होतात त्यामुळे सुद्धा केस गळू शकतात, वेगवेगळे केमिकल युक्त तेल, शाम्पू, जेल लावल्याने हि केस गळू शकतात, याचबरोबर आजकाल जो तो मानसीक तणावात असल्याचे आपण बघत आहोत.

प्रत्येकाला कसल ना कसलं टेन्शन आहेच. या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला वेगवेगळ्या आरोग्य समस्यांना सामोर जाव लागत केस गळणे त्यापैकीच एक आहे. आज आपण असे काही घरगुती उपाय जाणून घेणार ज्याच्या मदतीने आपण आपले केस गळणे कमी करू शकता.

केस गळणे कमी करण्यासाठी आपण ह्या गोष्टी करा. केस जास्त गरम पाण्याने धुऊ नका. जास्त गरम पाण्याने केस धुतल्यास केस कोरडे, निर्जीव आणि खराब होतात आणि तुटू लागतात.

महत्वाची गोष्ट म्हणजे ताण किंवा चिंता यापासून दूर राहणे, यासाठी आपण सकाळी योगा करणे किंवा ध्यान करणे. अशा गोष्टी करू शकता. केस गळू नये यासाठी आपण पुरेशे पाणी प्यायले पाहिजे. पोषक आहार घेतला पाहिजे. रात्री पुरेशी झोप घेतली पाहिजे.

केस गळणे कमी करण्यासाठी 2 चमचे मेथीच्या दाण्यांची पावडर एका वाटीत घ्या त्यामध्ये 2 चमचे मेहंदी पावडर मिसळा नंतर थोडेसे पाणी मिसळून पेस्ट बनवा. हि पेस्ट आपल्या केसांच्या मुळाशी लावा.

अर्धा तास राहूद्या नंतर थंड पाण्याने केस धुऊन टाका. हा उपाय आठवड्यातून एक वेळा करा. आपले केस गळणे कमी होईल. केस अधिक चमकदार आणि मजबूत होतील.

केस गळणे कमी करण्यासाठी आपण केसांच्या मुळाशी कांद्याचा रस देखील लावू शकता. कांद्यामध्ये असणाऱ्या सल्फर या घटकामुळे रक्त परिसंचरण सुधारून केसांच्या वाढीस मदत होते. आणि केस गळणे देखील कमी होते.

केस मजबूत करण्यासाठी नारळाच्या तेलामध्ये कढीपत्त्याची काही पाने मिसळून उकळून गार केलेल्या तेलाचा वापर करा. कढीपत्त्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स, प्रथिने आणि बीटा – कॅरोटीन असत ज्यामुळे केस मजबूत होण्यास मदत मिळते.

आपल्याला केस गळणे थांबवण्यासाठी घरगुती उपाय ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *