- आरोग्य

भाजलेल्या वांग्याची भाजी खाण्याचे आरोग्यदायी फायदे

वांग्याच्या भाजीमध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडेंट असतात ज्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यासाठी वांगी उपयुक्त असतात. वांग्याच्या भाजीमध्ये अँटीऑक्सिडंट्स,लोह, पोटॅशियम, फायबर, व्हिटामिन ए, व्हिटामिन बी, व्हिटामिन सी असे पोषक घटक असतात. आज आपण जाणून घेणार आहोत भाजलेले वांगे खाण्याचे फायदे.

वांग्याच्या भाजीमध्ये व्हिटॅमिन सी असते, वांग्याची भाजी खाल्याने प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते. वांग्यात असलेले पोटॅशियम, फायबर, जीवनसत्त्वे हृदय मजबूत बनवतात. वांगी शरीरात रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त असतात.

वांग्याच्या भाजीमध्ये कॅल्शियम आणि पोटॅशियम चांगल्या प्रमाणात आढळत. त्यामुळे वांग्याची भाजी खाल्ल्याने हाडे मजबूत व्हायला मदत मिळते. वांग्याच्या भाजीमध्ये फायबर घटक असतात. फायबर शरीरातून विषारी घटक काढून टाकण्याचे कार्य करतात.

वांग्याच्या भाजीमध्ये अगदी कमी प्रमाणात कॅलरी असतात, वजन कमी करण्यासाठी आपण प्रयत्न करत असाल तर आपण वांग्याची भाजी खाल्ली पाहिजे. 100 ग्रॅम वांग्यामध्ये फक्त 25 ग्रॅम कॅलरी असतात.

वांग्यात फायबरचे प्रमाण जास्त असते परंतु त्यात कार्बोहायड्रेट्स मुळीच नसतात, यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी ते खूप चांगले असते. फायबर रक्तातील साखर नियंत्रित करायला मदत करते.

वांग्याच्या भाजीमध्ये असणारी अँटीऑक्सिडंट्स शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करतात. फायबर अन्न पचन करण्यास मदत करते म्हणून कोलेस्ट्रॉल वाढत नाही.

वांग्याच्या भाजी शरीरातून विषारी पदार्थ काढून टाकते आणि चेहरा सुंदर आणि निरोगी बनवते. त्वचेबरोबरच वांगी केसांसाठी देखील फायदेशीरअसतात, वांग्याची भाजी खाल्ल्याने केस मजबूत बनतात आणि वाढ हि चांगल्या प्रकारे होते. आपल्याला भाजलेल्या वांग्याची भाजी खायला आवडते का हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा.

आपल्याला भाजलेले वांगे खाण्याचे आरोग्यदायी फायदे ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *