- आरोग्य

ताजी अंडी कशी ओळखावी?

निरोगी राहण्यासाठी आपण पोषक आहार म्हणून आपण अंडी खात असतो. अंड्यामध्ये अनेक पोषक घटक असतात. अंडी खाल्याने आपल्याला उर्जा मिळते. अंड्यामध्ये प्रोटीन, आयरन, व्हिटामिन ए, व्हिटामिन बी 6, व्हिटामिन बी 12, फोलेट, फास्फोरस असे पोषक घटक असतात. म्हणून आपण अंडी उकडून, शिजवून,आमलेट बनवून, भुर्जी बनवून खात असतो.

परंतु बऱ्याचदा आपण बाजारातून अंडी घेऊन येतो. ती उकडल्यावर आपल्या लक्षात येत कि हे अंडे आतून खराब आहे. हे अंडे ताजे नसून अनेक दिवस ठेवलेले जुने अंडे आहे. अशी अंडी खाल्ली तर आपल्या आरोग्यावर याचा वाईट परिणाम होऊ शकतो.

म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत. ताजी अंडी कशी ओळखता येऊ शकतात. अंडी ताजी आहेत का हे ओळखण्यासाठी आपण अंड्यांच्या बॉक्सवर लिहिलेली तारीख बघू शकता. एक्सपाइरी डेट होऊन गेलेली अंडी घेणे आपण टाळू शकता.

अंडी ताजी आहेत का हे ओळखण्यासाठी आपण हा सोपा उपाय आपल्या घरी करून बघू शकता यासाठी एका वाडग्यात पाणी घ्या. त्यामध्ये आपण बाजारातून आणलेली अंडी नाजूक असतात त्यामुळे हलक्या हाताने ठेवा.

जर अंडे तळाला गेले तर ते ताजे आहे असे आपण समजू शकता. जर अंडे वरच तरंगू लागल तर समजून जा कि ते खराब किंवा शिळे आहे. अंडे जर जुने असेल तर त्याच्या आतमध्ये हवेची एक पिशवी बनते. ज्यामुळे ते पाण्यावर तरंगू लागते.

अंडी ताजी आहेत का हे ओळखण्यासाठी आपण फ्लॅश लाईटचा वापर करू शकता यासाठी अंडे फ्लॅश लाईटसमोर धरून उजव्या बाजूने डावीकडे फिरवा. असे केल्यावर आपल्याला अंड्याच्या आतमध्ये पिवळा बलक आणि त्याच्या आत हवेची पिशवी तयार झालेली दिसेल.

जर हि हवेची पिशवी मोठी असेल तर अंड खराब किंवा जुने झालेलं असू शकत. परंतु जर हि पिशवी आकाराने छोटी असेल तर ते अंडे ताजे आणि चांगलं आहे. अस आपण म्हणू शकता.

बाजारातून अंडी घेताना अंड्यावर कोणती पावडर लावली आहे का हे बघा, अंड्या वरच्या कवचाला कुठे तडा गेला आहे का हे बघा, कुठे लहानसे छिद्र आहे का हे बघा. अशा पद्धतीने नीट तपासून अंडी खरेदी करा.

अंडे फोडल्यानंतर अंड्यामधून हिरवी, काळी, निळया रंगाची घाण दिसल्यास ते अंडे ताबडतोब फेकून द्या. अशी अंडी खाल्ल्याने आपल्याला आरोग्यविषयक समस्या होऊ शकतात. जसे कि पोटात दुखणे, उलट्या, जुलाब इत्यादी.

आपल्याला ताजी अंडी कशी ओळखावी? ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *