- आरोग्य

टाचदुखीने त्रस्त असाल तर करा हा घरगुती उपाय वेदना काही मिनिटांत दूर होतील

आपल्या शरीराचा संपूर्ण भार हा टाचांवर असतो. चालताना, धावताना, उडी मारल्यावर आपल्या टाचा जमिनीवर आदळत असतात. प्रमाणापेक्षा जास्त वजन वाढल्याने, शरीरामध्ये कॅल्शियमच्या कमतरतेमुळे टाचा दुखण्याचा त्रास सुरु होत असतो.

एकदा टाचदुखी सुरु झाली कि लवकर बरी होत नाही. टाच दुखत असल्यावर आपल्याला रोजची काम करणे हि अवघड होऊन जात. म्हणूनच आज आम्ही आपल्याला असे काही घरगुती उपाय सांगणार आहोत ज्याच्या मदतीने आपली टाच दुखी थांबू शकते.

टाच दुखत असल्यावर एका मोठ्या भांड्यात पाणी गरम करा त्यामध्ये अर्धी वाटी सैधव मीठ उपलब्ध नसल्यास (खडे मीठ) टाका. मग पाणी सहन होईल इतके गार झाल्यावर त्यामध्ये आपली टाच बुडवून ठेवा. अंदाजे 10 ते 15 मिनिटे टाच बुडवून ठेवा. हा उपाय केल्याने आपल्याला लवकर आराम वाटेल.

टाच दुखी कमी करण्यासाठी आपण टाचेची मालिश करू शकता यासाठी एका वाटीत थोडेसे मोहरीचे तेल हलके गरम करून घ्या. नंतर त्या तेलाने हलक्या हाताने आपल्या टाचेची मालिश करा. मालिश केल्याने पायाच्या शीरा मोकळ्या होतील आणि आपल्याला आराम वाटेल.

टाच दुखी कमी करण्यासाठी दिवसातून 3 वेळा एक ग्लास कोमट पाण्यात चार ते पाच दिवस २ चमचे आल्याचा रसात मध मिसळून प्या. असे केल्याने टाच दुखीच्या वेदना कमी होऊन आपल्याला बरे वाटेल.

आपल्याला टाच दुखी कमी करण्यासाठी घरगुती उपाय ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *