- आरोग्य

ह्या स्क्रबने 10 रुपयांपेक्षा कमी खर्चात नको असलेले केस काढून टाका

आपला चेहरा चांगला दिसाव, अस प्रत्येक स्त्रीला वाटत असत. सुंदर दिसण्यासाठी वेगवेगळ्या सौंदर्य प्रसाधनाचा वापर केला जातो. मात्र चेहऱ्यावर बारीक बारीक केस असल्यास ते आपल्या सौंदर्यात बाधा आणायचे काम करतात.

ह्या अवांछित केसांना काढून टाकण्यासाठी मग पार्लरमध्ये जाऊन वॅक्स करावे लागते. वॅक्स केल्याने अवांछित केस निघून जातात आणि बरेच दिवस येत नाहीत. मात्र वॅक्स करण्यासाठी खर्च जास्त होतो. म्हणूनच आज आम्ही अशा काही सोप्या टिप्स आपल्याला देणार आहोत ज्याच्या साह्याने आपण घरच्या घरी अवांछित केस काढून टाकू शकाल.

अवांछित केस काढून टाकण्यासाठी बनवण्यात येणाऱ्या स्क्रबसाठी आपल्याला पुढील साहित्य लागेल. 4 शुगर क्यूब, 3 चमचे साखर, 3 चमचे लिंबाचा रस, थोडा बटाट्याचा रस, आणि थोडेसे चण्याच्या डाळीचे पीठ ह्या सगळ्या गोष्टी मिक्सरमध्ये एकजीव करून घ्या.

नंतर हातामध्ये रबरी मोजे घालून हे मिश्रण आपल्या चेहऱ्यावर ज्या ठिकाणी अवांछित केस आहेत त्या ठिकाणी लावा 20 मिनिटे पूर्णपणे सुकू द्या. नंतर हाताने हि पेस्ट चोळून काढून टाका.

हा स्क्रब आपल्या चेहऱ्यावरील केस लहान असताना करा. हा स्क्रब लावल्याने आपल्या चेहऱ्यावरील अवांछित केस निघून जायला मदत होईल. तसेच त्वचा मऊ होईल. त्वचेला चमक येईल.

आपल्याला घरच्या घरी अवांछित केस काढून टाकण्यासाठी घरगुती उपाय ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *