- आरोग्य

फॅटी लिव्हर आजार लक्षणे आणि घरगुती उपाय

लिव्हर हा आपल्या शरीरातील महत्त्वाचा अवयव आहे. मराठीमध्ये याला यकृत असे म्हणतात. आज आपण जाणून घेणार फॅटी लिव्हर ह्या आजाराची लक्षणे कोणकोणती असतात आणि फॅटी लिव्हर हा आजार टाळण्यासाठी कोणकोणते घरगुती उपाय करू शकतो. याची माहिती आपण घेणार आहोत.

आपण निरोगी आणि स्वस्थ राहाव म्हणून आम्ही वेगवेगळ्या आरोग्यविषयक समस्या बद्दल माहिती देत असतो. आपल्याला हि माहिती नियमित वाचायला मिळावी यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करून ठेवा. सर्वप्रथम जाणून घेऊयात लिव्हर म्हणजे काय असत त्याची कार्य कोणकोणती आहेत.

लिव्हर हा आपल्या शरीरातील दुसरा सर्वात मोठा अवयव आहे. लिव्हर आपल्या पोटाच्या उजव्या बाजूला असते. लिव्हर हे पाठीचा कणा असलेल्या प्राण्यांमध्ये असते. आपल्या शरीरातील कोलेस्टेरॉल नियंत्रणाचं काम लिव्हर करत असते.

शरीरातील अनावश्य्क गोष्टींचा, विषारी घटकांचा निचरा करण्याचे काम लिवर करत असते. चयापचय प्रक्रियेस आवश्यक असणारे पित्त निर्माण करण्याचे कार्य लिव्हर करते. हि काही मुख्य कार्य आपले लिव्हर करत असते.

बदलत्या जीवनशैलीमुळे, पचायला जड असणारे पदार्थ खाल्याने, तेलकट, चरबीयुक्त पदार्थांचे अतिसेवन केल्याने, अस्वच्छ पाणी किंवा दूषित खाद्यपदार्थ खाल्याने, नियमित म’द्यपान केल्याने, नियमित रासायनिक घटक असणारे कोल्डड्रिंक्स प्यायल्याने.

वजन प्रमाणापेक्षा वाढल्याने, औषधांचे अति प्रमाणात सेवन केल्याने आपल्या लिव्हरमध्ये अतिरिक्त चरबी जमा व्हायला लागते. यालाच फॅटी लिव्हर असे म्हणतात. लवकरच यावर उपाय न केल्यास लिव्हर निकामी होण्याचा धोका असतो.

आपल्या लिव्हरमध्ये अतिरिक्त चरबी जमा झाल्यामुळे ते सूजते आणि त्यामुळे लिव्हर चांगल्याप्रकारे त्याची कार्य करू शकत नाही. परिणामी आपण खाल्लेल्या अन्नामधील चरबीचे पचन व्यवस्थित होत नाही.

लिव्हरमध्ये अतिरिक्त चरबी जमा झालेली असल्यास भूक लागत नाही, वजन कमी व्हायला सुरुवात होते, अशक्तपणा येतो, कंटाळा आल्यासारखे वाटते, नाकातून रक्तस्त्राव हि होऊ शकतो.

त्वचेवर खाज सुटते, त्वचेचा रंग बदलल्यासारखे वाटते, चेहरा निस्तेज दिसायला लागतो, ओटीपोटात दुखायला लागत, पाय दुखायला लागतात. अश्या प्रकारची लक्षणे या आजारामध्ये दिसून येतात.

शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करून आपण ह्या आजाराची तीव्रता कमी करू शकतो. शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी आपण शारीरिक कसरतीचे व्यायाम करू शकता, जसे कि सायकल चालवणे, पोहणे, सूर्यनमस्कार घालणे, दोर उद्या मारणे.

सकाळी संध्याकाळी अर्धा तास चालायला जाणे, धावणे, अधिकाधिक शारीरिक कसरत केल्याने आपले लिव्हर चांगले व्हायला मदत मिळते. याचबरोबर आहाराची काही पथ्ये आपण पाळली पाहिजेत जसे कि अति तेलकट.

पचायला जड असणारे पदार्थ खाणे, म’द्यपान करणे, पूर्णपणे थांबवावे लागेल. नियमित मांसाहार करत असल्यास तो आठवड्यातून एकदाच करा. शरीरातील अतिरिक चरबी कमी होण्यासाठी आपण नियमितपणे सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास कोमट पाण्यात लिंबू पिळून ते प्यायची सवय लावू शकता.

शरीरातील अतिरिक चरबी कमी होण्यासाठी आपण सकाळी एक चमचा ऍपल सायडर व्हिनेगर कोमट पाण्यात मिसळून पिऊ शकता. यामुळे आपल्या शरीरातील चरबी कमी व्हायला मदत होईल. सकाळी आवळ्याचा रस घेतल्याने सुद्धा आपल्या शरीरातील विषारी घटक लघवी आणि विष्टेवाटे बाहेर निघून जातात.

हळदीमध्ये असणारे एंटी-इंफ्लेमेटरी अँटिऑक्सिडंट गुणधर्म यकृताच्या पेशींना नुकसानापासून वाचवतात. म्हणून आपल्या अन्नामध्ये अल्प प्रमाणात हळदीचा समावेश नक्की असुद्या.

आपल्याला फॅटी लिव्हर आजार लक्षणे आणि घरगुती उपाय ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *