- आरोग्य

शरीरातील रक्त वाढीसाठी सोपे घरगुती उपाय

युवकांपासून वयस्कर व्यक्तींपर्यंत रक्त कमी होण्याची समस्या निर्माण होऊ शकते. याचे मुख्य कारण फास्टफूड, अवेळी जेवण, अवेळी झोपणे. पूर्वी लोक सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत पौष्टिक आहार घेत असत. सध्या आपण जे अन्नपदार्थ खातो त्यामुळे रासायनिक पदार्थांचा भडीमार असल्याचे आपल्याला पाहायला मिळत.

या सर्व गोष्टींचा परिणाम होऊन बऱ्याच वेळा आपल्या शरीरातील रक्ताचे प्रमाण अत्यंत कमी होऊन जात मग आपल्याला रक्त वाढीसाठी आपल्याला डॉक्टरकडे जावे लागते. आज आम्ही असे काही उपाय सांगणार आहोत ज्याच्या मदतीने घरच्याघरी आपण शरीरातील रक्त वाढवू शकता.

रक्त कमी झाल्यास बऱ्याचवेळा चक्कर येण्याची समस्या उद्भवते. अशावेळी नेहमी गूळ आणि शेंगदाणे सोबत ठेवा. गूळ आणि शेंगदाणे खाल्याने हिमोग्लोबिन वाढते. यामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे रक्त वाढायला मदत मिळते.

शरीरामध्ये रक्त वाढविण्यासाठी सर्वात उत्तम उपाय म्हणजे मोड आलेले कडधान्ये. तुम्ही रात्री भिजवलेले कडधान्ये रोज सकाळी उठून नाष्टा म्हणून सेवन केले तर रक्त कमी होण्याची समस्या निर्माण होणार नाही. रक्त वाढीसाठी हा एक प्रभावी उपाय आहे.

रक्त आणि हिमोग्लोबिनची कमतरता भरून काढण्यासाठी रोजच्या आहारात दूध आणि खजुराचा समावेश करावा. हा एक सोपा उपाय आपण करू शकता. रोज खजुरा दुधासोबत घेतल्यास रक्त वाढते.

फळांमध्ये सफरचंद, डाळिंब, गाजर, बिट, खाणे रक्त वाढीसाठी आवश्यक आहे. त्याचबरोबर तुम्ही नियमित एक टोमॅटो खाल्यास रक्त लवकर वाढते. अंजीर खाणे हा ही एक पर्याय आहे. या फळांचा समावेश आहारात करावा.

क जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळेही शरीरातील रक्त कमी होऊ शकते. यासाठी क जीवनसत्त्व असलेले खाद्यपदार्थ खा. आवळ्यामध्ये क जीवनसत्त्व भरपूर असते. शरीरातील रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी आपण हिरव्या पालेभाज्यांचा आपल्या आहारात समावेश करू शकता.

रक्ताची कमतरता होऊ नये यासाठी आपण शक्य तितका सात्विक आहार घ्या. बाहेरच्या गोष्टी खाणे टाळा. रात्रीचे जागरण करू नका. भरपूर पाणी प्या. शारीरिक व्यायाम करा.

आपल्याला शरीरातील रक्त वाढीसाठी सोपे घरगुती उपाय ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *