- आरोग्य

“सायटिकाच्या” वेदना कमी करण्यासाठी प्रभावी घरगुती उपाय

वयाच्या चाळीशीनंतर होणारा सायटिका हा आजार आता आपल्या बदलेल्या जीवनशैलीमुळे तरुणपणातच बऱ्याच जणांना होत असल्याचे आपण बघत आहोत. सायटिका ह्या आजारामध्ये आपल्या पोटऱ्यामध्ये आणि मांड्याच्या मागच्या भागात प्रचंड वेदना होत असतात.

आपल्या शरीरातील मणक्याच्या मधून निघालेल्या नसेवर दाब आल्याने ह्या वेदना होत असतात. या आजारामध्ये आपल्या पायांना मुंग्या यायला लागतात, एका जागेवर जास्त वेळ बसल्यावर पाय जड झाल्यासारखे वाटते.

थोडस चालल तरी पाय आणि मांड्या दुखू लागतात. ह्या वेदना कमी करण्यासाठी काही प्राथमिक घरगुती उपाय आज आपण जाणून घेणार आहोत. हा आजार प्राथमिक अवस्थेत असताना आपण त्यावर हे उपाय केले तर आपल्याला या आजारातून नक्कीच मुक्त होता येऊ शकत.

सायटिकाच्या वेदना कमी करण्यासाठी आपण पारिजातकाच्या पानांचा वापर करू शकता यासाठी सर्वप्रथम आपण साधारणपणे 250 ग्राम पारिजातकाची पाने धुऊन त्याचे हाताने तुकडे करा.

आणि त्यानंतर एक लिटर पाणी एका पातेल्यात घ्या त्यामध्ये हि पाने टाकून गॅसवर उकळून घ्या. हे पाणी अर्धे राहिल्यानंतर गॅस बंद करून हा काढा गाळून घ्या त्यानंतर हे पाणी सकाळी एक कप आणि संध्याकाळी एक कप या प्रमाणात प्या.

काही दिवस हा उपाय केल्यानंतर वेदना कमी होऊन आराम वाटेल. सायटिकाच्या वेदना कमी करण्यासाठी आपण मोहरीच्या तेलाने मालिश करू शकता. मालिश केल्याने नसा मोकळ्या व्हायला मदत मिळते.

सायटिकामुळे आपल्या पायांना सूज आलेली असल्यास जायफळ बारीक वाटून तीळाच्या तेलात तळून घ्या. या तेलाने नियमित मालिश केल्याने पायांची सूज नाहीशी व्हायला मदत होईल आणि आपल्याला आराम मिळेल.

सायटिकाचा त्रास टाळायचा असेल तर पायांचा नियमित व्यायाम करा. नियमित व्यायामामुळे पायांचे स्नायू बळकट होतात. यासाठी आपण सायकल चालवणे, पोहणे, धावणे असे व्यायाम करू शकता.

या सोबतच भुजंगासन, वायुमुद्रा, मकरासन हि योगासने सुद्धा करू शकता. यामुळे आपल्या पायाचे स्नायू मजबूत होतील. आपल्या आहारामध्ये शेंगदाणे, गुळ, सुकामेवा, दुध अशा कॅल्शीयमयुक्त गोष्टींचा समावेश असुद्या.

आपल्याला “सायटिकाच्या” वेदना कमी करण्यासाठी प्रभावी घरगुती उपाय ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *