- आरोग्य

केस लांब, दाट, चमकदार बनवण्यासाठी घरगुती उपाय

आपले लांब, दाट, चमकदार केस आपल्या व्यक्तिमत्वात भर घालतात यात शंका नाही. म्हणूनच प्रत्येक स्त्रीला आपले केस लांब, दाट आणि चमकदार असावे अस वाटत.

परंतु आजकालच्या जीवनशैलीमुळे, वाढत्या प्रदूषणामुळे, पोषक आहाराच्या अभावामुळे आपण आपल्या केसांची पाहिजे तितकी काळजी घेऊ शकत नाही म्हणूनच आज आम्ही अशा काही सोप्या पद्धती सांगणार आहोत ज्याच्या मदतीने आपण हि आपले केस दाट आणि चमकदार करू शकाल.

केस लांब, मऊ आणि दाट बनवण्यासाठी आठवड्यातून दोन वेळा केसांना कोरफड गर लावा. कोरफड गरामध्ये व्हिटॅमिन ए, सी, ई, बी 12 आणि फॉलिक ऍसिड सारखी खनिजे आणि पोषक घटक असतात.

कोरफड गर केसांना लावल्याने आपल्या केसांमधील कोंडा हि नाहीसा होईल. यासाठी कोरफड गर केसांना लावल्यानंतर दोन तास राहू द्या नंतर पाण्याने आपले केस धुऊन टाका.

केस लांब, मऊ आणि दाट आपण आपल्या केसांच्या मुळांची म्हणजेच टाळूची नारळाच्या तेलाने दररोज 5 मिनिटे हलक्या हाताने मालिश करा. टाळूला मसाज केल्याने टाळूमध्ये रक्ताभिसरण चांगले होईल, आणि केस मजबूत होतील.

नियमित एक आवळा खाल्ल्याने किंवा आवळ्याचा रस प्यायल्याने आपले केस लांब आणि दाट होण्यास मदत मिळू शकते. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते, जे केस वाढण्यास मदत करते यासोबतच केसांना चमकदार बनवते.

आपल्याला “केस लांब, दाट, चमकदार” बनवण्यासाठी घरगुती उपाय ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *