- आरोग्य

तुरटीचे आपल्या त्वचेसाठी आणि आरोग्यासाठी असणारे 5 महत्वाचे फायदे

आपण निरोगी आणि स्वस्थ राहाव यासाठी आम्ही रोज वेगवेगळ्या औषधी गुणधर्म असणाऱ्या गोष्टी बद्दल आपल्याला माहिती देत असतो. आज सुद्धा आम्ही अशीच एक नवीन माहिती आपल्याला देणार आहोत. फोटोमध्ये बघून आपल्याला समजेलच असेल आपण कोणत्या गोष्टी बद्दल जाणून घेत आहोत.

आपल्या पूर्वजांना तुरटीचे औषधी गुणधर्म माहित होते म्हणूनच जुन्या घरामध्ये अजून हि तुरटीचा खडा असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. मात्र आजकाल या बद्दल विचारल तर कोणाला हि काही माहिती नसत.

म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत. तुरटीचे आपल्या आरोग्यासाठी कोणकोणते फायदे आहेत आणि तुरटीचा वापर वेगवेगळ्या आरोग्य समस्यांसाठी कसा करायचा.

आपल्याला जर कुठे छोटीशी जखम झाली आणि त्या भागावरून रक्तस्राव होत असेल तर त्यावर तुरटीचा खडा फिरवल्यास रक्त थांबते. आपण रक्तस्त्राव थांबवण्यासाठी तुरटीची पावडर हि वापरू शकता.

तुरटीला हिंदी मध्ये फिटकरी अस म्हणतात. आपल्याला जर कोरडा खोकला येत असेल तर तुरटीचा छोटा खडा कोमट पाण्यात विरघळवून त्या पाण्याने गुळण्या केल्या तर आपला खोकला थांबण्यास मदत मिळते.

तोंडाला दुर्गंध येत असेल, दात दुखत असेल तर कोमट पाण्यात तुरटीचा खडा विरघळून त्या पाण्याने गुळण्या केल्या तर तोंडाला येणारा दुर्गंध नाहीसा होतो. दात दुखीच्या वेदना कमी होतात. तुरटीच्या खडा पाण्याने जरासा ओला करून नियमित आपल्या त्वचेवरून फिरवला तर आपल्या त्वचेवरील सुरकुत्या कमी व्हायला मदत मिळते.

अंगाला घामाचा जास्त वास येत असेल आणि अंगाला खाज येत असेल तर आंघोळीच्या पाण्यात थोडीशी तुरटीची पावडर मिसळा. त्या पाण्याने आंघोळ केल्याने आपल्या अंगाला येणारा घामाचा वास बंद होईल तसेच खाज येणे हि बंद होईल.

आपल्याला तुरटीचे आपल्या त्वचेसाठी आणि आरोग्यासाठी असणारे फायदे ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *