- आरोग्य

लघवी करताना जळजळ वेदना होण्याची कारणे आणि घरगुती उपाय

लघवी करताना जळजळ वेदना होणे ह्या गोष्टीचा आपण एकदा तरी अनुभव घेतला असे. बऱ्याचदा आपण काही कामात असल्याने आपल्याला लघवीला जाता येत नाही अन नंतर काही वेळाने आपण लघवीला गेल्यावर आपल्याला हा त्रास होतो.

आपल्याला होत असलेला हा त्रास बऱ्याचवेळा लपवला जातो. डॉक्टरकडे जाणे टाळले जाते. लघवी करताना आपल्याला नेहमीच जळजळ अथवा वेदना होत असतील तर ते किडनी स्टोनचे हि लक्षण असू शकते.

म्हणून आजार प्राथमिक अवस्थेत असतानाच आपण त्यावर उपाय केले पाहिजे. आज आम्ही आपल्याला लघवी करताना जळजळ वेदना होऊ नये यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहे.

बाहेर खूप जास्त तापमान असल्यास बऱ्याचदा घरात बसून असल तरी सुद्धा शरीरात उष्णता वाढून झाल्यामुळे उन्हाळी लागते. जे लोक जेवणात जास्त मिरची, मसाले आणि तेलकट पदार्थ वापरतात त्यांनाही वारंवार लघवी करताना जळजळ होण्याची समस्या होण्याचा धोका असतो.

शरीरातील पाण्याची कमतरता कमी झाल्यास व शरीराचे तापमान गरमीमुळे वाढत असल्यामुळे लघवीतील क्षारचं प्रमाण वाढतं त्यामुळे उन्हाळी लागते. आणि लघवी करताना जळजळ होते.

लघवी करताना जळजळ वेदना होत असल्यास त्या थांबवण्यासाठी आपण दिवसातून 2 ते 3 वेळा एक ग्लास लिंबू पाणी प्या. असे केल्याने आपल्याला लवकर आराम मिळू शकतो.

लघवी करताना वेदना होत असल्यास त्या थांबवण्यासाठी आपण नारळाचे पाणी पिवू शकता. नारळ पाण्यामधून आपल्याला आवश्यक खनिजे आणि जीवनसत्वे मिळत असतात. शरीराला हायड्रेटेड ठेवण्याचे काम नारळ पाणी करते. लघवी करताना जळजळ वेदना होऊ नये यासाठी पुढील प्रकारे काळजी आपण घेऊ शकता.

दुपारच्या वेळी उन्हामध्ये बाहेर जाणे टाळा. घराबाहेर पडताना शक्यतो सुती पांढऱ्या रंगाचे कपडे वापरा. पांढऱ्या रंगाच्या सुती कपड्यामुळे उन्हापासून संरक्षण होण्यास मदत होते.

दिवसभर शक्य तितके जास्तीत-जास्त पाणी प्यायचा प्रयत्न करा. अति तिखट, मसालेदार गोष्टी खाणे टाळा, शरीराचे तापमान नियंत्रणात राहण्यासाठी दिवसातून दोन वेळा गार पाण्याने आपण अंघोळ करू शकता.

आपल्याला लघवी करताना जळजळ वेदना होण्याची कारणे आणि घरगुती उपाय ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *